Morjim Parking  Dainik Gomantak
गोवा

Morjim: मोरजीत नो पार्किंग झोन केवळ फलकांवरच! रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची गर्दी; स्थानिक हैराण

Morjim No Parking Zone: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मोरजीतील न्यू वाडा येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला नो पार्किंग झोन जाहीर केला. त्यानुसार पंचायतीने त्या ठिकाणी नो पार्किंग फलक लावले आहेत.

Sameer Panditrao

Morjim No Parking Zone Violations

मोरजी: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मोरजीतील न्यू वाडा येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला नो पार्किंग झोन जाहीर केला. त्यानुसार पंचायतीने त्या ठिकाणी नो पार्किंग फलक लावले आहेत. तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. या विरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

या रस्त्याच्या बाजूला हॉटेल्स, रिसॉर्ट व अन्य दुकाने आहेत. मात्र येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची सोय नाही, त्यामुळे वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पार्क केली जातात. जरी हा रस्ता नो पार्किंग झोन जाहीर केला असला तरी या आदेशाला कुणी जुमानत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडसर निर्माण होतो. याचा प्रचंड मनस्ताप स्थानिकांना सहन करावा लागतो.

पार्किंग प्रकल्प आवश्‍यक

येथील व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांसाठी पार्किंगची सोय केली नसल्याने या समस्येत अधिक भर पडली आहे. यावर तोडगा काढणे आता आवश्‍यक झाले आहे. रस्त्यावरील पार्किंग थांबवायचे असेल तर दुसरा पर्याय देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पंचायत व येथील व्यावसायिकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. येथे येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग प्रकल्प उभारावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT