Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी, 25 पेक्षा अधिकजण जखमी

टेम्पो देवगडच्या दिशेने जात असताना दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याने यात 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर, टेम्पो देवगडच्या दिशेने जात असताना दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप टेम्पो देवगड पाडगावच्या दिशेने लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होता. दरम्यान, पिकअप चालकाने डिव्हायडरवर गाडी चढवल्याने महामार्गावर टेम्पो पलटी झाला. यात 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

अनेकांच्या डोके, हाताला गंभीर दुखापत झाली असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. महामार्गाचे मागील बारा वर्षांपासून काम रखडलं आहे. पुढील वर्षी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहे. मात्र, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Protest: अमित पाटकरांसह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, आझाद मैदानाजवळ काँग्रेसचा निषेध मोर्चा अडवला Watch Video

Goa Live News: फातोर्डा पोलिसांनी केली पाच आरोपींविरुद्ध लूकआउट नोटीस जारी

Goa Congress Protest: 28 मतदार एकाच खोलीत? निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक नेमणूक; काँग्रेसचा मोठा आरोप

Govt Raises Gambling Fines: सरदेसाईंच्या स्टिंग ऑपरेशननंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर, जुगार दंडात केली मोठी वाढ

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT