mopa airport incident report Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Air India Taxiway Takeoff Goa: एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एक विमान चुकून धावपट्टीऐवजी टॅक्सीवेवरून उड्डाण करण्याचा प्रयत्न करत होते

Akshata Chhatre

मोपा: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Manohar International Airport) एक अत्यंत गंभीर घटना घडली होती, ज्याचा आता अंतिम अहवाल समोर आला आहे. 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) ने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एक विमान चुकून धावपट्टीऐवजी टॅक्सीवेवरून (Taxiway) उड्डाण करण्याचा प्रयत्न करत होते. 'एअर ट्राफिक कंट्रोल'च्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

पायलटच्या चुकांमुळे घडला प्रकार

'एअर इंडिया'चे AI2592 हे हैदराबादला जाणारे विमान उड्डाणासाठी सज्ज होते. मात्र, पायलटने धावपट्टीऐवजी समांतर असलेल्या टॅक्सीवेवरूनच विमान वेगाने पुढे नेण्यास सुरुवात केली. विमान सुमारे १२४ नॉट्सच्या वेगाने पुढे गेले होते. त्याच वेळी, एअर ट्राफिक कंट्रोलला ही गंभीर चूक लक्षात आली आणि त्यांनी त्वरित पायलटना उड्डाण थांबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तात्काळ विमान थांबवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. नंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले.

अहवालात अनेक त्रुटी उघड

'AAIB' च्या तपास अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पायलटांचे लक्ष विचलित झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे अहवालात नमूद आहे. इलेक्ट्रॉनिक फ्लाइट बॅगमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी आणि उड्डाणाच्या तयारीदरम्यान पायलटांकडून योग्य तपासणी न होणे, ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सुरक्षा नियमांवर भर

हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, 'AAIB' ने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. कॉकपिटमधील शिस्त सुधारणे, धावपट्टी आणि टॅक्सीवेची ओळख अधिक स्पष्ट करण्यासाठी उपाययोजना करणे आणि मानवी चुका कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

'राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही', वाळपईत मराठी भाषाप्रेमींचे धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT