Goa Rain Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोसळल्या जोरदार मान्सूनसरी

मॉन्सूनचे किंचित बिलंबाने पण धडाकेबाज आगमन; शेतकऱ्यांमधून समाधान

दैनिक गोमन्तक

पणजी : गेल्या काही दिवसांपासून देशभर संभ्रम निर्माण करणारा मॉन्सून अखेर शुक्रवारी सकाळी गोव्यात दिमाखात दाखल झाला. गुरुवारी रात्रीपासूनच मॉन्सूनपूर्व सरींनी राज्यात हजेरी लावली होती. मॉन्सूनसाठी आवश्‍यक असलेले वातावरणीय निकष पूर्ण झाल्याने भारतीय हवामान खात्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल केली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून कारवारमध्ये रेंगाळलेल्या मॉन्सूनने आपले राज्य व्यापत दक्षिण महाराष्ट्रातही सलामी दिली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात वेळेअगोदर 10 दिवस मॉन्सूनने हजेरी लावली होती. मॉन्सूनबाबतच्या पूर्वानुभवांच्या आधारे मॉन्सूनची वाटचाल भारतीय उपखंडात वेळेआधीच होईल, असे गृहीत धरत काही अनुमान मांडले होते. एक जूनच्या नियमित तारखेपेक्षा तीन दिवस अगोदर केरळमध्ये मॉन्सूनसरी कोसळण्यास सुरवात झाली. त्यापुढील संपूर्ण केरळ, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग व्यापला होता. पुढील तीन दिवसांच्या वाटचालीनंतर मॉन्सून एक जूनला राज्याच्या वेशीवरील कारवार जिल्ह्यात दाखल झाला होता.

मात्र, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेश परिसरात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे पश्‍चिम-दक्षिण वाऱ्यांवर विपरित परिणाम झाल्याने मॉन्सून तब्बल दहा दिवस कारवारमध्येच रेंगाळला होता. 2007 नंतर इतके दिवस कारवारमध्ये मॉन्सून रेंगाळण्याची ही गेल्या 21 वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे.

अखेर नैऋत्य मौसमी वाऱ्यांना मिळालेली गती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे मॉन्सून वाऱ्यांना पोषक स्थिती निर्माण झाली आणि राज्यात मॉन्सून दाखल झाला. काल रात्रीपासून हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाल्याचे जाणवले.

शुक्रवारी पेडण्यात सर्वाधिक पाऊस

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पेडण्यात सर्वाधिक 45.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल सांगे येथे 33.7, काणकोण येथे 29.2, राजधानी पणजीत 23.7, तर दाबोळी येथे 22.6 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार दुपारनंतर जोरदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस सांगे येथे 117. 8 मिमी. झाला असून पेडणे येथे 87.4 पावसाची नोंद झाली आहे.

वर्षातील 75 टक्के कमी पाऊस

हवामान खात्याच्या धोरणानुसार जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने मॉन्सूनचे मानले जातात. राज्यात 1 जूनपासून आतापर्यंत 180.9 मिमी. पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात तो 46.1 मिमी. झाला आहे. मॉन्सून कारवारमध्येच रेंगाळल्याने पावसाची 75 टक्के तूट दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT