Goa Assembly Monsoon Session 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: दरडी कोसळणे, पूरसदृश स्थिती; आमदारांनी पावसाळी दुर्घटनांकडे वेधले लक्ष

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: विविध खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना; पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभा अधिवेशनात दरड कोसळू नये, झाडे उन्मळून पडू नयेत, पूर येऊ नयेत यासाठी संरक्षक भिंती बांधणे, नद्यांतील गाळ उपसणे, नाल्यांची स्वच्छता करणे, पंपिंग स्टेशन बसवणे आणि विविध खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना आमदारांनी केल्या. टेकडी कापणी आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्याची अंमलबजावणी न केल्यामुळे पावसाळ्यात राज्यात दरडी कोसळत आहेत, तसेच पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे, याकडे विरोधकांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यात सत्ताधारी आमदारांनी सहभाग घेतला.

मंगळवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांच्या मतदारसंघातील पूर आणि भूस्खलनाचा विषय मांडला. मुसळधार पावसामुळे आपल्या मतदारसंघातील वाळवंटी नदीला पूर आला असून नदीकाठची झीज होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यामुळे लोकांमध्येही चिंता वाढली असून प्रमुख रस्त्याचा काही भाग खचण्याच्या मार्गावर आहे. भूस्खलन टाळण्यासाठी वाळवंटी नदीजवळ तुळशिमळा येथे संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी केली. स्थानिक लोकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने काही सुरक्षा उपाय योजावेत, असेही त्या म्हणाल्या.

डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनीही मुसळधार पावसामुळे साळ, नानोडा, डिचोली मार्केट जंक्शन अशा काही भागात पाणी साचल्याचे सांगितले. हा पूर टाळण्यासाठी कुडचिरे ते सारमानस नदीचे गाळ काढण्याची गरज आहे. पूरग्रस्त जागेतील पाणी काढण्यासाठी पंपिंग स्टेशन बसवल्यास पावसाळ्यात स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनीही त्यांच्या मतदारसंघात नुकतेच भूमिगत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे नमूद केले. नाल्यांमध्ये गाळ साचला असून आपल्या मतदारसंघातील रस्ते आणि इतर रहिवासी भागात पाणी साचले आहे.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, पंचायत विभागांनी एकत्र काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.

हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी हळदोणे मतदारसंघात तुंबलेल्या गटारांमुळे पाणी साचल्याचे निदर्शनास आणून दिले. फेरेरा यांनी मत व्यक्त केले की, पूरसदृश स्थितीचे आणखी एक कारण म्हणजे शेतजमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे होणारा भराव. यावर सरकारने दखल घेतली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मेगा प्रकल्पामुळे पूरसदृश स्थिती

बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना राज्य सरकार ऐकत नसल्यामुळे व मेगा प्रकल्प आणल्यामुळे राज्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याची टीका केली. व्हिएगस म्हणाले की, बाणावली परिसरात सध्या पूर आला आहे. कारण साळ नदीतील गाळ काढण्यात आलेला नाही आणि तेथील नाले तुंबले आहेत. त्यामुळे नदीतील गाळ काढण्याची गरज आहे.

गाडगीळांच्या सूचनांची अंमलबजावणी करा’

आमदार वीरेश बोरकर यांनी आपल्या भाषणात गोव्यात सर्रासपणे डोंगर कापून, जमीन भराव टाकून बुजवून मोठी बांधकामे होत असल्याचे नमूद केले. गोवा हा पश्चिम घाटाचा भाग असल्याने तो पर्यावरण संवेदनशील आहे. गोव्याला आपत्तीतून वाचवायचे असेल, तर डॉ. माधव गाडगीळ यांनी दिलेल्या सूचनांची सरकारने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

पावसाळ्यानंतर संरक्षक भिंत: मोन्सेरात

लक्षवेधी सूचनांवर उत्तर देताना महसूलमंत्री अतानासिओ ऊर्फ बाबुश मोन्सेरात म्हणाले की, तुळशिमळा - पर्ये येथील वाळवंटी नदीजवळ मलबे दगड मांडणी करण्यात आली आहे. भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. याचबरोबर मुसळधार पाऊस थांबल्यानंतर वाळवंटी नदीच्या काठावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT