Goa Monsoon 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2025: गोव्यात तीन दिवस ऑरेंज अलर्ट; मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

Goa Rain 2025 Update: पुढील दोन दिवस राज्यात ताशी ४० ते ६५ किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

Pramod Yadav

पणजी: राज्यात सोमवारपासून काही काळ ऊन अन् काही काळ दमदार पावसाची बरसात सुरू आहे. वाऱ्याचा वेगही काहीसा मंदावल्याने पडझडीच्या घटनांतही घट झाली आहे. हवामान खात्याने तीन दिवसांसाठी (२७, २८ आणि २९ मे) ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तीन दिवस ऑरेंज, चार दिवस यलो अलर्ट

राज्यात तीन दिवसांसाठी (२७ ते २९ मे) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, ३० मे ते ०२ जून पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात एक जून पासून ६१ दिवसांसाठी मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील सर्वच भागात पहाटे आणि रात्री जोरदार पावसाची बरसात होत आहे. मधल्या कालावधीत पावसाची संततधार सुरू असते. पुढील दोन दिवस राज्यात ताशी ४० ते ६५ किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. आज, उद्या आणि परवा राज्यात ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे.

पिकांचे नुकसान, झाडांची पडझड

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तर, काढणीला आलेल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, यात ८ ते ९ लाखांचे नुकसान झाले आहे. सर्व्हे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT