Crime  Dainik Gomantak
गोवा

Mapusa: अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, कुटुंबीय घराबाहेर असताना त्याने संधी साधली

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

Pramod Yadav

बार्देश तालुक्यातून एक विनयभंगाची घटना समोर आली आहे. एका गावात अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, त्याचवेळी तिचे कुटुंबीय घराबाहेर बसले असताना एका युवकाने संधी साधून तिचा विनयभंग केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्देश तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी 22 वर्षीय युवकाला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, यावेळी कुटुंबीय घराबाहेर बसले होते. दरम्यान, या संधीचा फायदा घेऊन 22 वर्षीय युवक घरात घुसला व मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडोओरडा केल्यानंतर संशयित पसार झाला.

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई- वडीलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पलोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 452, 323, 354, तसेच, 353 (क), गोवा बाल कायदा कलम 8 (2) व पोस्को कायदा कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रिचा भोसले पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT