goa police arrested thief  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : सात वर्षांच्या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Maina Curtorim Police : 7 वर्षांच्या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

7 वर्षांच्या बालिकेवर 51 वर्षांच्या इसमाने विनयभंग केल्याचे प्रकरण मायणा कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडले आहे. हे प्रकरण पुढील कारवाईसाठी मडगाव महिला पोलीस केंद्राकडे देण्यात आले आहे.

घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत संशयित एल्विस फेर्राव याने सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. झालेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला दिल्यानंतर पीडितेच्या आईने मायणा कुडतरी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली.

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संशयिताचा शोध घेत अटक केली. तक्रारीत विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव देण्यात आले होते. संशयिताला मडगाव प्रथमवर्ग सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान हे प्रकरण मडगाव महिला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT