CCTV Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: कचरा समस्येप्रश्नी मोयरा ग्रामपंचायत अॅक्शनमोडवर

ग्रामपंचायतीने घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात रस्ते अपघाताबरोबरच कचऱ्याची समस्या सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे. पणजी, मडगाव, म्हापसा ठिकाणच्या वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचरा समस्या देखील वाढत चालली आहे. म्हापसा- मोयारा पुलाजवळ देखील दिवसेंदिवस कचऱ्याचे वाढते ढीग पाहायला मिळत असून या समस्येवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर काही प्रमाणात चाप बसेल

गावात प्रवेश करताना पुलाच्या कडेला टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र गलिच्छपणा वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरत असून गावाची प्रतिमा मालिन होत आहे. त्यामुळे मोइरा पुलाजवळ कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी मोयरा ग्रामपंचायतीने घटनास्थळावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेकवेळा येथील स्थानिकांनी हा रस्ता साफ करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती आणि पंचायतीने देखील या कामी हातभार लावून कचरा उचलला होता.

सदरचा परिसर बस्तोडा ग्रामपंचायतीच्या देखील अखत्यारीत येत असल्याने मोइरा पंचायतीने त्यांना पत्र लिहून या प्रकरणी आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यास सांगितले होते.

मात्र बस्तोडा ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मोइरा पंचायतीने हा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT