mobile tower Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील मोबाईल टॉवर ‘आउट ऑफ कव्हरेज’

कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा: नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

दैनिक गोमन्तक

साळ: डिचोली तालुक्यातील साळ येथे मोबाईल टॉवर उभारून एक महिना उलटला तरी तो कार्यान्वित झालेला नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देवस्थान जमीन क्षेत्र ‘आम्यानी’ येथे मोबाईल टॉवर उभा राहिला. 10 ते 12 एप्रिलपर्यंत तो कार्यान्वित होणार, असे सांगण्यात आले होते. मात्र तो अजूनही कार्यान्वित होण्याची चिन्हे दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोविड-19मुळे गेली 3 वर्षे शालेय शिक्षण व नोकरवर्गाचे "वर्क फ्रॉम होम" सुरू होते. मात्र साळमध्ये एकाही कंपनीचा टॉवर नसल्याने व त्याचे प्रक्षेपण नसल्यामुळे विद्यार्थी तसेच नोकरवर्गाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. या स्थितीत अजूनही सुधारणा झालेली नाही.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारने व मोबाईल टॉवर मालकाने साळ येथील मोबाईल टॉवर लवकरात लवकर कार्यान्वित करावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यात जातीने लक्ष घालून टॉवर कार्यान्वित करण्याचा आदेश देतील, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT