amit thackeray Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्गासाठी 'राजपुत्र' उतरणार रस्त्यावर, जनजागृतीसाठी कोकणात 'जागर पदयात्रा'

पदयात्रा 23 ते 30 ऑगस्ट या कालावधीत तीन टप्प्यात पार पडणार आहे

Rajat Sawant

MNS On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन तसेच पडलेल्या खड्ड्यांवरुन मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभर मनसेच्या नेत्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले होते.

दरम्यान, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मनसेने आता पदयात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा 23 ते 30 ऑगस्ट या कालावधीत तीन टप्प्यात पार पडणार आहे.

मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेची 'जागर पदयात्रा' निघणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव, तर दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. 

मनसेची ही पदयात्रा एकूण तीन टप्यात पार पडणार असून पहिल्या दोन टप्प्यात चालत तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. 

मनसे नेते देशपांडे म्हणाले, "मुंबई गोवा महामार्गावर राजापूर पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सरकार गणपतीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं फक्त आश्वासन देत आहे. लोकांना या महामार्गावरुन प्रवास करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या खड्ड्यांमुळे अपघात होवून काही लोकं मृत्यू पावली आहेत. त्यांच्या मृत्यूबद्दल सरकारला कोणतीच खंत वाटत नाही. अपघातग्रस्तांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. कोकणात परप्रांतिय जमिनी विकत घेत आहे. या सगळ्या प्रश्नांवर लोकांना जागे करण्यासाठी तसेच झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या पदयात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. या पदयात्रेत कोकणातल्या लोकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT