Viresh Borkar  Dainik Gomantak
गोवा

Viresh Borkar: '..तर गोमंतकीयांसाठी जागा राहणार नाही'! जमीन संरक्षण विधेयकासाठी आंदोलन आवश्यक; आमदार बोरकर

Land Conversion Bill For Goa: राज्यातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे आहे. मी ते विधेयक विधानसभेत देखील मांडले होते. नियंत्रण आणायचे असेल, तर कायदा अत्यावश्यक आहे, हे मी पूर्वीपासून सांगत आल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Needs Land Conservation Bill Says MLA Viresh Borkar

पणजी: राज्यातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे आहे. मी ते विधेयक विधानसभेत देखील मांडले होते. मात्र, त्याला सरकारचा पाठिंबा मिळाला नाही. त्यावर नियंत्रण आणायचे असेल, तर कायदा अत्यावश्यक आहे, हे मी पूर्वीपासून सांगत आल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासही मी तयार आहे, असे ते म्हणाले.

सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा पाठिंबा आहे का असे विचारले असता विरेश बोरकर म्हणाले, की प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि विविध माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अधिकार आहे. नाईक एका प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत.

आंदोलन आणि उपोषण करून काहीच फायदा नाही. कारण याआधी आम्ही खूप आंदोलने केली, पण आजही ते प्रकल्प सुरूच आहेत. त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे व त्यासाठी लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज आहे.

सरकार कोमुनिदाद जमिनी संपविण्यासाठी पुढाकार घेत आहे. म्हणूनच लोकांनी कायदा करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जर आम्ही जमीन संरक्षण विधेयक आणले नाही, तर भविष्यात गोमंतकीयांसाठी जागा राहणार नाही. आज राज्यातील जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT