Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: अधिवेशनाचा कालावधी 15 दिवसांनी वाढविल्यास सभापतींची माफी मागण्यास तयार...

आमदार विजय सरदेसाई यांचे रमेश तवडकरांना प्रतिआव्हान; विरोधक एकवटले

Akshay Nirmale

Vijay Sardesai: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 जानेवारी ते 19 जानेवारी या काळात होणार आहे. तथापि, हा कालावधी अपुरा असून अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील आमदार करत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई आणि इतर विरोधी आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

यावेळी आ. विजय सरदेसाई म्हणाले की, सभापती तवडकर हे दुटप्पी भुमिका घेत आहेत. सरकारने जरी कामकाजाचे दिवस ठरवले असले तरी सभापती खासगी सदस्यांसाठी दिवस देऊ शकतात. सभापतींना तेवढे अधिकार असतात. सभापतींनी जर अधिवेशनाचा कालावधी 15 दिवसांनी वाढवला तर मी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांची माफी मागतो, असे प्रतिआव्हान आ. सरदेसाईंनी दिले आहे. विजय सरदेसाई यांनी सोमवारी बोलताना तवडकर यांना मुख्यमंत्र्यांचे कामगार असे संबोधले होते.

पत्रकार परिषदेत युरी आलेमाव म्हणाले की, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांची भेट नाकारणे हे गैर आहे. सभापती तवडकर यांनी आधी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली होती. आता मात्र ते आम्हाला भेटणार नाही, असे म्हणत आहेत. आमदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात सभापती अपयशी ठरले आहेत. आता आम्ही सर्व विरोधक राज्यपालांची भेट घेणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT