Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Turdal Rotted: जाणीवपूर्वक सडवल्याचा आमदार विजय सरदेसाईंनी केला आरोप

दैनिक गोमन्तक

कोरोना काळात महाराष्ट्र राज्यसरकराकडून तुरडाळ खेरदी केली होती. यापैकी तब्बल 242 मेट्रीक टन तूरडाळ सडली होती. यावरुन गोवा राज्यात मोठे वादंग उठले आहेत. राज्यात अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर आरोप करत हे नूकसान केवळ राज्याच्या अनागोंदी कारभारामूळे झाले असल्याचं म्हटले आहे. यातच आता भर पडली असून आमदार विजय सरदेसाई यांनी या आशयाचे वक्तव्य केले आहे.

( 242 metric tons of turdal rotted Government of Goa responsible for this MLA Vijay Sardesai made the allegation)

सरदाई याबाबत म्हणाले की, सडलेली 242 मेट्रीक टन तूरडाळ विकत घेण्यास मुख्यमंत्री आणि तत्कालीन नागरी पुरवठा मंत्र्यांनी मंजुरी दिली होती. त्यामूळे या साऱ्या नुकसानीला गोवा सरकारच जबादार आहे.. गोवा फॉरवर्डकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. यातूनच तूरडाळ जाणीवपूर्वक सडवल्याचा आमदार विजय सरदेसाईंनी आरोप केला आहे.

या प्रकरणात तत्कालीन आजी - माजी मंत्र्यांनी हात झटकल्याने तत्कालीन अधिकारी या प्रकरणात अडकणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावर चौकशी समिती नेमणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी खरंच दोषींवर कारवाई होणार का ? ही संशोधनाचा विषय आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

गोवा राज्यातील जनतेला कोरोना काळात वाटपासाठी आणलेल्या तुरडाळीच्या साठ्यातील तब्बल 241 टन डाळ सडली आहे. त्या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने निविदा काढल्याने प्रशासनाचे अब्रूचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.

काँग्रेस पक्षाने हे प्रकरण बाहेर काढले आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदी-शहांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी मुद्दाम तुरडाळ खराब केली का? असा सवालही काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने स्थानिक दैनिकांमध्ये तूरडाळ विल्हेवाटीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

त्या जाहिरातीवरून पणजीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. 18 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनांकडे लक्ष वेधले आहे, त्याशिवाय डाळ आयात करण्याचे केंद्र सरकारचे धोरण उघड झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत बेजबाबदार भाजप सरकारने वृत्तपत्रांतून तूरडाळीच्या विल्हेवाटीसाठी निविदा मागविल्याचे पाहून धक्का बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT