Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: मुख्यमंत्र्यांनी मर्जीतील भांडवलदारांना फायदा व्हावा म्हणून राज्यातील खाणींचा...

खनिज साठ्यावरुन आमदार सरदेसाई यांनी सामंत सरकारला फटकारले

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्याच्या खाणीत फक्त 260 दशलक्ष टन खनिज शिल्लक आहे. या वृत्तावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त करताना 1.74 अब्ज टन खनिज कुठे उडून गेले? असा सवाल केला आहे. तसेच गोव्यातील खनिज साठा खरंच कमी झाला आहे? की मर्जीतील भांडवलदारांच्या फायद्यासाठी कमी दाखविण्यात आला आहे. असा ही त्यांनी सवाल केला आहे.

(MLA Vijai Sardesai alleges Pramod Sawant on Goa mining )

2013 साली विजय सरदेसाई यांनी गोव्यातील खनिज साठ्या संदर्भात विधानसभेत प्रश्न विचारला असता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 2 अब्ज टन खनिज साठा खाणीत बाकी असल्याचे उत्तर दिले होते. आयबीएमनेही त्यावेळी 1.1 अब्ज टन खनिज साठा बाकी असल्याचे नमूद केले होते.

ऑक्टोबर 2013 मध्ये गोव्यात 45 टन खनिज काढण्याची मर्यादा घातली होती. त्यापैकी 25 टन हे साठवून ठेवलेल्या खनिज साठ्यातील असणार असे स्पष्ट केले होते. गोव्यात असलेला खनिज साठा पुढच्या 50 ते 100 वर्षासाठी पुरेल असा अंदाज त्यावेळी पर्रीकर यांनी व्यक्त केला होता.

पर्रीकर यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने खनिज उत्खननाची मर्यादा पाळली नसल्याने येत्या 10 वर्षात खनिज साठा संपणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड लॉकडाऊनच्या वेळी सरकारने ई ऑक्शनच्या नावाखाली अतीप्रमाणात खनिज उत्खनन करण्याची मोकळीक दिली. तसेच वारेमाप खनिज विकण्यास मुभा दिली असा आरोप सरदेसाई यांनी केला.

गोव्यातील खनिज साठा खरेच इतका कमी झाला आहे की आपल्या मर्जीतील भांडवलदारांना फायदा व्हावा म्हणून मुद्दामहून कमी दाखविण्यात आला आहे का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT