Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ५० हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप! 'झुआरी' संदर्भात खरेदीदारांची यादी सादर

Pramod Sawant: झुआरीची सनद तसेच विक्रीखत बेकायदा असल्यास ते रद्द करतो असे आश्‍वासन मुख्यमंत्री सावंत यांनी आज दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उद्योगासाठी दिलेली जमीन झुआरी ॲग्रो केमिकल्स लि. कंपनीने गृहनिर्माण संकुल तसेच भूखंड करून बिगर गोमंतकीयांना लाखापेक्षा अधिक चौ. मी. किमतीने विकले आहेत. हा सुमारे ५० हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला धारेवर धरले.

मात्र, या प्रकरणाची चौकशी करू. झुआरीची सनद तसेच विक्रीखत बेकायदा असल्यास ते रद्द करतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिले.

झुआरी ॲग्रो केमिकल्स लि., झुआरी इंडस्ट्रिज लि. आणि संलग्न उद्योगांची सविस्तर माहिती द्यावी तसेच कंपनीच्या जमिनीसंदर्भात सनदेसाठी किती अर्ज आले? गेल्या ५ वर्षांत या जमिनीची म्युटेशन्स, पार्टिशन केले असल्यास त्याचीही माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी मागितली होती. यावेळी परप्रांतीय जमीन खरेदीदारांची यादीच आमदार सरदेसाई यांनी सादर केली.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात उद्योग आल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, या उद्देशाने सांकवाळ कोमुनिदादची ५४० हेक्टर जमीन २५ पैसे प्रति चौ. मी. या दराने झुआरी ॲग्रो केमिकल्स लि. कंपनीला दिली होती.

या कंपनीने त्यांचा व्यवसाय कमी झाल्याने तेथील काही भूखंड विक्रीस काढले आहेत. सुमारे ३ लाख चौ. मी. जमीन निवासी संकुल उभारण्यासाठी सनद घेतल्या आहेत.

नटराजन यांचा सल्ला कधी?

झुआरी ॲग्रो केमिकल्स कंपनीला दिलेल्या जमिनीसंदर्भात ॲडव्होकेट जनरलांचे मत घेतले होते. त्यानंतर सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराजन यांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मत मागितले आहे. मात्र, ते अद्याप मिळालेले नाही, असे उत्तर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले.

५९२ कोटींचा घोटाळा

झुआरी कंपनी २ हजार फ्लॅटस् बांधणार असून त्यांची किंमत प्रति ५५ हजार चौ. मी. रुपये आहे. हा सुमारे ५९२ कोटींचा घोटाळा आहे. झुआरी कंपनीने काही भूखंडही विक्रीस काढले असून १.१९ लाख रुपये प्रति चौ. मी. दराने विकले आहेत, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT