MLA Venzy Viegas press conference On Plastic Rice Dainik Gomantak
गोवा

Plastic Rice In Goa: बाणावलीत रेशनवर प्लास्टिक तांदूळ? आमदार व्हिएगस यांचा धक्कादायक दावा

सरकारकडे चौकशीची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Plastic Rice In Goa: राज्यात सर्वत्र रास्त भाव दुकानातून निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी सुरू आहेत. त्यातच आता बाणावलीत आमदार वेन्झी व्हिएगस यांनी शिधापत्रिकाधारकांना प्लास्टिक तांदळाचा पुरवठा होत असल्याचा दावा केला आहे.

व्हिएगस यांनी बाणावलीत ज्या महिलेला प्लास्टिक तांदुळ मिळाले तिलाच पत्रकार परिषदेत हजर केले. तिने सांगितले, की पुष्कळ वेळ झाला तरी भात होत नाही म्हणून आपण बाकी तांदुळ काढून तपासून पाहिले. या तांदळांमध्ये पाणी मुरत नसल्याचे दिसून आले.

आग लावली तर तांदळाचा प्रकार प्लास्टिकप्रमाणे होतो व कुठल्याही वस्तुला चिकटतो. हा प्रकार आपण आमदारांच्या निदर्शनास आणला. व्हिएगस यांनी देखील पत्रकारांसमोर हा तांदुळ पाण्यात मुरत नसल्याचा व आग लावली तर काय होते, याची प्रात्यक्षिकेच करून दाखवले.

"हा तांदूळ नेमका येतो कुठून, या प्रकारामध्ये नेमके कोण कोण गुंतलेले आहेत, याचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी प्रकरणाची सखोल व दक्षता खात्याकडून चौकशी करणे व सत्य लोकांसमोर आणावे. संबंधित खात्याच्या मंत्र्याला या प्रकरणाची काहीच माहिती नसणे यासारखे दुसरे आश्‍चर्य नाही."

वेन्झी व्हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT