benaulim water supplies problems Dainik Gomantak
गोवा

Benaulim : पेडा वार्का येथील पाणी प्रश्न सोडवणार; आमदार व्हीएगस यांचे संतप्त नागरिकांना आश्वासन

संतप्त नागरिकांनी याबाबतची लेखी तक्रार आमदार व्हीएगस यांच्याकडे केली

Rajat Sawant

Benaulim : बाणावलीतील पेडा वार्का येथील स्थानिक नागरिकांना गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना कधी रात्री 1 ते 2 तास पाणी मिळते तर कधी खूप संथ गतीने पाणीपुरवठा होतो.

हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस यांच्याकडे केली.

याबाबतची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार व्हीएगस यांनी पेडा वार्का येथे जात त्या भागातील पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची पाहणी केली. येथील स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडवण्याची जवाबदारी मी घेतो. नागरिकांना लवकरच सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार व्हीएगस म्हणाले, या मतदारसंघात पाणीप्रश्नच्या समस्या निवडणुकीपूर्वी पासून भेडसावत आहेत. निवडणुकीपूर्वी मी 'उदकाची सुटका' ही मोहीम चालू केली होती आणि आता पाण्याचा मुक्त प्रवाह करण्याची वेळ आली आहे असे आमदार व्हीएगस यांनी सांगितले.

मुख्य समस्या म्हणजे, आमच्या पाईपलाईन खूप जुन्या आहेत. माजी क्रीडामंत्री व बाणावलीचे माजी आमदार फ्रांसिस्को मॉंत क्रुझ यांच्या कार्यकाळात पाईपलाईन टाकल्या गेल्या होत्या. त्या खूप पूर्वीच बदलायला हव्या होत्या, मी पाईपलाईन बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके, 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

SCROLL FOR NEXT