BJP MLA Rajesh Faldessai Dainik Gomantak
गोवा

आमच्यासाठी 'शेतकरी' महत्त्वाचे आहेत! कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहात आमदार फळदेसाईंचे प्रतिपादन

Rajesh Phaldesai: हा कार्यक्रम आधुनिक कृषी पद्धतींसह शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि धोरणकर्त्यांसोबत सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे फळदेसाई म्हणाले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडत नाही, दोन्ही सरकारे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहेत, असे प्रतिपादन गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष व कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केले.

प्रत्येकाला राज्य सरकार सरकारी नोकऱ्या देऊ शकत नाही. आमच्या दोन वेळच्या जेवणासाठी शेतकरी महत्त्वाचे आहेत. संकटकाळातही आम्ही शेतकऱ्यांना भरपाई देतो. माझ्या मतदारसंघातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीची आम्ही भरपाई देखील केली आहे. बरेच शेतकरी शेतात कष्ट करून कुटुंबाचे पालन पोषण करतात आणि आपल्या मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या योगदानाबद्दल मी माझ्या मतदारसंघात दोन महिन्यांपूर्वी २०० शेतकऱ्यांचा सत्कार केला होता.

केव्हीके - जुने गोवे येथे आयसीएआर - सीसीएआरआय आयोजित कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आयसीएआर - सीसीएआरआयचे संचालक डॉ. प्रवीण कुमार, केव्हीके उत्तर गोवाचे प्रमुख व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. बोम्मयासामी, एसएमएस ॲनिमल सायन्सेस केव्हीके उत्तर गोवा डॉ. संजय कुमार उद्धव, आयसीएआर-सीसीएआरआय राहुल कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

२३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आधुनिक कृषी पद्धतींसह शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि धोरणकर्त्यांसोबत सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT