Aam Aadmi Party Dainik Gomantak
गोवा

चांगल्या परिवर्तनासाठी आप'ला सत्तेत आणा : राजेश गुप्ता

भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यास हातभार लावावा असे दिल्लीचे आमआदमी पक्षाचे आमदार राजेश गुप्ता यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

केपे : गोव्यातील जनता अतिशय प्रेमळ असून त्याचप्रमाणे निसर्गाने या राज्याला भरभरून वरदान दिले आहे पण येथील लोक मात्र आमदार निवडीच्या वेळी चुकीच्या माणसाला का निवडून देतात हे समजत नाही पण ही चूक यावेळी नकरता आमआदमीच्या (Aam Aadmi Party) उमेदवाराला निवडून ध्यावे व भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यास हातभार लावावा असे दिल्लीचे आमआदमी पक्षाचे आमदार राजेश गुप्ता (MLA Rajesh Gupta) यांनी सांगितले.

कुंकळी येथे आयोजित केलेल्या कुंकळी परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. यावेळी कुंकळी मतदारसंघाचे आमआदमी पक्षाचे उमेदवार प्रशांत नाईक, निवृत्त हेडमास्तर दिनेश देसाई, जोरसोन गोम्स व इतर मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत आमआदमी पक्षाने शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात भरीव काम केले असून याचा सामान्य लोकांना बराच फायदा होत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

लोकांचा पैसा परत लोकांपर्यंत कसा पोहचवायचा ह्याचा विचार मुखमंत्री केजरीवाल करीत असून एक चांगले सरकार आम्ही दिल्लीत दिले आहे व लोकांचा आमच्या पक्षाला पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. दिल्ली प्रमाणे गोव्यातही भ्रष्टाचार मुक्त सरकार सत्तेवर आणण्यासाठी लोकांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणावे असे आवाहन गुप्ता यांनी लोकांना केले.

कुंकळी मतदारसंघाचा आतापर्यंत कोणताच विकास झालेला नसून आमदाराने लोकांना फक्त आश्वासने देण्याचे काम केले आहे असे प्रशांत नाईक यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रातही कुंकळीचे मतदारसंघ बराच मागे असून जर आपण निवडून आल्यास कुंकळीत पन्नास खाटाचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. कुंकळी मतदारसंघाचा विकास हेच काम असणार असून युवकांना रोजगार मिळवून देण्यास आपले प्राधान्य असणार आहे असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT