Kudchade  Dainik Gomantak
गोवा

Kudchade News :पांडुरंगाच्या जीवनात नवचैतन्याची पालवी; कुडचिरेतील बालकाला कृत्रिम पायांचा आधार

Kudchade News : कुडचिरे येथील पांडुरंग गावकर याला समाज कल्याण खात्याच्या योजनेतून कृत्रिम पाय बसविले आहेत. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नांमुळे या बालकाच्या जीवनात नवी पालवी फुटली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kudchade News :

डिचोली, जन्मत:च पायाने अधू आणि कायम जमिनीला खिळलेल्या कुडचिरेतील १२ वर्षीय बालकाला आता कृत्रिम पायांचा आधार मिळाला आहे.

कुडचिरे येथील पांडुरंग गावकर याला समाज कल्याण खात्याच्या योजनेतून कृत्रिम पाय बसविले आहेत. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नांमुळे या बालकाच्या जीवनात नवी पालवी फुटली आहे.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मंगळवारी (ता. २६) या बालकाच्या घरी भेट देऊन त्याची विचारपूस केली. यावेळी कुडचिरेच्या सरपंच प्रियंवदा गावकर तसेच पांडुरंगचे आई-वडील उपस्थित होते.

कृत्रिम पाय प्रत्यक्ष कसे काम करतात आणि पांडुरंग या कृत्रिम पायांवर उभा राहून कसा चालू शकतो, त्याची आमदार शेट यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रती पांडुरंगचे वडील सागर गावकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आई-वडिलांच्या खांद्यावरून तो जायचा शाळेत

पांडुरंगचे दोन्ही पाय जन्मत:च वाकडे होते. त्यामुळे कृत्रिम पाय बसवेपर्यंत पांडुरंग उभा राहिलाच नाही. आईवडील त्याला खांद्यावर घेऊन शाळेत नेत असत. मध्यंतरी आई-वडिलांनी पांडुरंग उभा राहावा म्हणून खूप प्रयत्न केले.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याचे वाकडे झालेले पाय काढले. बिगर सरकारी संस्थांनीही मदत केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर आमदार शेट यांनी या बालकाला कृत्रिम पाय मिळवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT