Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem: प्रत्येक रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट उभारणार; आमदार प्रवीण आर्लेकर

Pernem: सर्व रस्त्यांवर आवश्यकतेनुसार पथदीप उभारून परिसर प्रकाशमान करण्याची योजना असल्याचे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Pernem:

पेडणे मतदारसंघातील प्रमुख आणि अंतर्गत गावागावांत जाणाऱ्या रस्त्यांवर जर पथदीप नसेल तर तो परिसर अंधारमय असतो याची दखल घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्व रस्त्यांवर आवश्यकतेनुसार पथदीप उभारून परिसर प्रकाशमान करण्याची योजना असल्याचे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी खुटवळ परिसरात नवीन पथदीप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करताना केले.

यावेळी हळर्णचे सरपंच मयूर परब, माजी सरपंच दिव्या नाईक, पंच विनोद हरिजन, रामचंद्र परब, सिद्धी राऊळ, शैलेश नाईक आदी उपस्थित होते. आमदार आर्लेकर पुढे म्हणाले, की मतदारसंघातील प्रत्येक रस्ता प्रकाशमान व्हायला हवा. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्यातून प्रत्येक रस्त्याच्या बाजूला पथदीप बसवून अंधार दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक जनतेने आणि पंचायत मंडळांनी आपापल्या परिसरातील विकासकामांना प्राधान्य देताना सहकार्य करावे.

यापूर्वी पेडणे मतदारसंघातील समस्या कोणीही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. बेरोजगारी हा विषय गंभीर आहे, परंतु सर्वांना सरकारी नोकऱ्या मिळणे शक्य नसल्याने प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे ज्या ज्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. मोपा विमानतळ प्रल्पातून अनेक रोजगार उपलब्ध झालेले आहेत, त्याचा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

सरपंच मयूर परब यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सहकार्यातून खुटवळ ते बैलपारपर्यंतच्या मुख्य रस्त्याला पथदीप उभारण्यात येत आहेत आणि याचे श्रेय आमदार प्रवीण आर्लेकर जाते, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT