Daniel Lobo Elected Unopposed as Parra Sarpanch Dainik Gomantak
गोवा

Parra Panchayat: मॉम - डॅड आमदार, मुलगा सरपंच; डॅनियल लोबो पर्रा पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध

Daniel Lobo Elected Unopposed as Parra Sarpanch: ३० डिसेंबर २०२४ रोजी पंचायतीचे तत्कालिन सरपंच चंदानंद हरलकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.

Pramod Yadav

म्हापसा: आमदार मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांचा मुलगा डॅनियल लोबो यांची पर्रा ग्रामपंचयातीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. पंचायतीच्या सरपंचांनी डिसेंबरमध्ये दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद खाली होते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सर्व पंचांनी लोबो यांनी पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

३० डिसेंबर २०२४ रोजी पंचायतीचे तत्कालिन सरपंच चंदानंद हरलकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पर्रा पंचायतीचे सरपंच पद खाली होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत पंचायतीच्या सर्व पंचांनी युवा नेते डॅनियल लोबो यांना समर्थन दिले. लोबो यांची पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

डॅनियल लोबो यांची संरपंचपदी निवड झाल्याबद्दल आई वडिल मायकल व दिलायला लोबो यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गावच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी डॅनियल लोबो यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT