faleiro 
गोवा

पत्राची दखल न घेतल्याने  आमदार लुईझिन फोलेरोंची नाराजी 

विलास महाडिक

पणजी

कोविड - १९ पार्श्‍वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती व प्राधान्यक्रम बदललेला असल्याने राज्याचा अर्थसंकल्प चर्चा न करताच संमत करणे योग्य नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात फेररचना करून तो नव्याने एका महिन्यात मांडण्यात यावा व त्यावर चर्चा केली जावी असे पत्र दिले होते मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही याबाबत विरोधी आमदार लुईझिन फालेरो यांनी नाराजी व्यक्त केली. 
विधानसभेचे प्रश्‍नोत्तराचे कामकाज सुरू होताच विरोधी आमदार लुईझिन फोलेरो म्हणाले की, गेल्या ९ जुलैला मी सभापतींना पत्र पाठविले होते मात्र त्याला कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. मी सातवेळा आमदार म्हणून निवडून आलो असल्याने ज्येष्ठ आमदारांच्या
पत्राची दखल घेतली जात नाही याचे वाईट वाटते. राज्यात कोविड महामारीची समस्या आहे. सरकारच्या महसूल व खर्चामध्ये बदल झाला आहे त्यामुळे सुमारे २२ हजार कोटींचा अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना संमत केला जाऊ नये. सरकारने खर्चासाठी लेखा अनुदान घ्यावे त्याला तसेच या महामारीविरोधात लढा देण्यास सहकार्य केले जाईल. सरकारचे प्राधान्यक्रम बदलले आहेत त्यामुळे हा अर्थसंकल्प एकाचवेळी संमत करता येणार नाही, असे फोलेरो म्हणाले. 
दरम्यान, विरोधी आमदार रवी नाईक यांनीही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, ८ जुलैला मी सुद्धा ऑनलाईन शिक्षणासंदर्भात पत्र दिले होते व पोचपावती आहे मग हे पत्र सभापतींपर्यंत कसे काय पोहचले नाही याची चौकशी करावी अशी मागणी नाईक यांनी केली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT