सासष्टी, मी देवाचा माणूस आहे, मी देवाशी बोलतो, असे टोमणे मारून माझी थट्टा केली जाते. मी देवाचा भक्त आहे, हे कोणीही नाकारणार नाही. त्याचबरोबर श्री दामोदर, श्री नागेश यांच्याबरोबरच माझे कार्यकर्ते, मतदार हेही माझे खरे दैवत असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी ७० व्या वाढदिनी सांगितले.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कामत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असून त्यांच्यामुळेच देशाची प्रतिमा जगभर उंचावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे हात पुन्हा बळकट करा.
गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही पंतप्रधानांच्या पायावर पाय ठेवून स्वयंपूर्ण गोवा व आत्मनिर्भर गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही कामत म्हणाले.
सकाळच्या कार्यक्रमात अनेक आमदार, मंत्री, माजी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक आणि मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या.
यात भाजपचे राज्य सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार केदार नाईक, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांचा समावेश होता.
संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. कामत यांचा वाढदिन साजरा करण्यासाठी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, सर्व नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
...तोपर्यंत राजकारणात असेन!
जोपर्यंत मला मडगाववासीयांचा पाठिंबा मिळत राहील व जोपर्यंत शरीरात त्राण असेल, तोपर्यंत मी राजकारणात असेन. तसेच समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच राहील. मी कधीही जात-धर्म, गरीब-श्रीमंती यावरून लोकांमध्ये भेदभाव केला नाही. गोरगरिबांची कधीही प्रतारणा केली नाही. त्यांना सदैव मदतीचा हात दिला व देत राहीन, असेही कामत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.