MLA Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

Vasco: उद्यानाचा विकास करणार; दाजी साळकरांचे आश्वासन

Vasco: नादुरूस्त असलेल्या बायणातील पालिका उद्यानाचा विकास गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco: अनेक वर्षापासून नादुरूस्त असलेल्या बायणातील पालिका उद्यानाचा विकास गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या उद्यानामध्ये व्यायामशाळा, फुटसाल मैदान, लहान मुलासांठी झोका, घसरगुंडी व इतर गोष्टी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दाजी साळकर यांनी दिली.

दाजी साळकर यांच्यासह मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, गोवा राज्य साधनसुविधी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व नगरसेवक दीपक नाईक, नगरसेवक रामचंद्र कामत, नगरसेवक दामोदर नाईक. उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, महामंडळाचे अधिकारी, सल्लागार वगैरे उपस्थित होते.

या उद्यानाची पाहणी केल्यावर साळकर म्हणाले, तेथे बायणावासियांसाठी अनेक गोष्टी विकसित करण्यात येणार आहेत. ज्याचा लाभ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत होणार आहे. दीपक नाईक यांनी या उद्यानाचा विकास खासगी एजन्सीमार्फत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही कारणास्तव प्रस्ताव मान्य झाले नाही.

आता सदर उद्यानाचा विकास साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात यावा, असा प्रस्ताव मी ठेवला होता. त्या प्रस्तावाला नाईक यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे काही महिन्यांमध्ये बायणा उद्यानाचे रूप बदलणार आहे. या उद्यानाच्या बाहेरील बाजूस दुकाने आहेत.

त्या दुकानाच्या वर एक हॉल बांधण्याचा विचार आहे. जेणेकरून पालिकेला महसूल मिळेल. या उद्यानात स्टेज आहे, त्याचा वापर विनायक कला संघाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी होऊ शकतो. गार्डनाचा विकास होणार असल्याने नगराध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी समाधान व्यक्त केले.

दीपक नाईक म्हणाले, या उद्यानाशी बायणावासियांचे भावनिक नाते आहे. या उद्यानाचा वापर सर्व वयोगटांसाठी कसा करता येईल, याचा विचार केला जाईल. या उद्यानाचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन मी पालिका निवडणुकीच्या वेळी दिले होते. ते आश्वासन पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी आमदार साळकर यांचे योग्य सहकार्य लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT