MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: हळदोणेत आरोग्य सुविधा द्या; कार्लुस फेरेरा यांची मागणी

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: आमदार फेरेरा यांनी गोमेकॉत उपचार घेताना आलेला स्वानुभाव कथन केला

गोमन्तक डिजिटल टीम

गोमेकॉतील सुविधा पाहता त्या खरोखरच उत्तम आहेत. तेथील सुविधांबाबत आरोग्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करतो, असे सांगत आमदार कार्लुस फेरेरा यांनी हळदोणे मतदारसंघातील हळदोणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात आणि त्या अद्ययावत कराव्यात, अशी मागणी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी आमदार फेरेरा यांनी आपली मागणी सभागृहाच्या पटलावर ठेवली. आमदार फेरेरा यांनी गोमेकॉत उपचार घेताना आलेला स्वानुभाव कथन केला. ते पुढे म्हणाले, आरोग्य केंद्रातील विद्युत वाहिन्या (वायरिंग) बदलाची गरज आहे. अत्यंत जुन्या असलेल्या या वाहिन्यांमुळे धोका संभवतो.

या जुन्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉर्टसर्किटचे प्रकार घडले आहे. या आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या पाच ते सहा गावांतील लोक उपचारासाठी येतात. या केंद्रावर सौरऊर्जा निर्मिती करावी, अशी मागणी आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासाची सोय चांगली नाही. संगणकीकृत सेवा निर्माण करावी.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस भंगार झालेल्या रुग्णवाहिका उभ्या आहेत, या न हटविल्याने त्या वाहनांत पाणी साचून डासांची उत्पत्ती होते आणि डेंग्यूचे रुग्ण निर्माण होण्याची भीती आहे.

ही भंगार झालेली वाहने हटवावीत, अशी मागणीही आमदार फेरेरा यांनी केली. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी आजारी असल्याने ते रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत कारभार पाहण्यासाठी कोणाची तरी नेमणूक करणे आवश्यक आहे. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय हे संदर्भासाठी आहे. अनेकदा येथील उपकरणे चालत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गोमेकॉत तेथून रुग्ण पाठविण्यासाठी वेळा ठरल्या आहेत का, तेही तपासले तपासणे आवश्यक आहे, असे फेरेरा म्हणाले.

रस्त्याबाजूला टाकतात कचरा

गोमेकॉच्या ब्लड बँकेत रक्ताचा अपुरा पुरवठा होत नसल्याचेही दिसून आले आहे. रक्तदात्याचे कार्ड असतानाही एका रुग्णास रक्त मिळाले नसल्याचा एक प्रकार घडला आहे. त्यामुळे अपुऱ्या रक्तसाठ्याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.

अन्न औषध प्रशासन खात्याद्वारे मटण, चिकन विक्री करणाऱ्या, बिफ स्टॉल्सना परवाना दिला जातो. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना याच खात्याकडून परवाना दिला जातो. परंतु त्यानंतर याठिकाणाहून तयार होणाऱ्या कचऱ्याचे काय करतात, हे तपासले जाते का, असा सवाल फेरेरा यांनी केला.

अनेक ठिकाणी हे विक्रेते कचरा खासगी मालमत्तेत, महामार्गाच्या बाजूला टाकतात. त्यामुळे एफडीएने अशा विक्रेत्यांची तपासणी करावी आणि जर ते व्यवस्थितरीत्या कचऱ्याची विल्हेवाट लावत नसतील तर त्यांचा परवाना निलंबित करावा, अशी मागणी आमदार फेरेरा यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fire In Gujarat Titans Team Bus: फायनलनंतर मोठी दुर्घटना! गुजरातच्या बसला आग; शुभमन गिल, बटलरसह सर्व खेळाडू 1 तास रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

SCROLL FOR NEXT