Pernem News Dainik Gomantak
गोवा

Pernem News: आमदार आर्लेकर अकार्यक्षम : ॲड. गावकर

Pernem News: कासारवर्णे पूर्वा जंक्शनवर मागच्या कित्येक महिन्यांपासून एक भला मोठा खड्डा पडला होता. तो खड्डा बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग अपयशी ठरले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : मोरजी, पेडणे मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती भयानक आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यातून होणारे अपघात हे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना दिसत नाही का? असा सवाल काँग्रेसचे नेते ॲड. जितेंद्र गावकर यांनी करून आमदार प्रवीण आर्लेकर हे अकार्यक्षम असून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

कासारवर्णे पूर्वा जंक्शनवर मागच्या कित्येक महिन्यांपासून एक भला मोठा खड्डा पडला होता. तो खड्डा बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग अपयशी ठरले.

शिवाय याच रस्त्यावरून स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर हे वारंवार कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने येत-जात असतात; परंतु त्यांना हा खड्डा आजपर्यंत दिसला नाही. त्याच्या निषेधार्थ पेडणे काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता.९) हा खड्डा बुजवण्यात आला.

त्यावेळी ॲड. जितेंद्र गावकर बोलत होते. यावेळी पेडणे गट काँग्रेस अध्यक्ष कृष्णा नाईक, सामाजिक कार्यकर्ते उदय महाले, भास्कर नारुलकर आदी उपस्थित होते.

ही मोठी शोकांतिका

सामाजिक कार्यकर्ते भास्कर नारुलकर यांनी सांगितले की, स्थानिक आमदाराला विकास करण्यासाठी कदाचित वेळ मिळत नसेल. त्यामुळेच असे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत.

आमदारांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना रस्त्यावर येऊन खड्डे बुजवावे लागतात, ही शोकांतिका आहे. त्यामुळे लोकांनी आता आमदारांना जाब विचारणे गरजेचे आहे. आमदार म्हणून त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

याच रस्त्यावर नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे बुजवावेत. खड्ड्यांत बसून सरकारच्या निषेधार्थ भजन करणारी नेतेमंडळी गेली कुठे? प्रवीण आर्लेकर हे आमदार होण्यापूर्वी याच खड्ड्यांत कार्यकर्त्यांसोबत बसून भजन करत होते आणि आता स्वतः आमदार झाल्यानंतर त्यांना रस्त्यांवरील खड्डे बुजवता येत नाहीत. त्यामुळे ते अकार्यक्षम असून त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा.
ॲड. जितेंद्र गावकर, काँग्रेसचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT