Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

MLA Antonio Vasis: केसरव्हाळ झऱ्यासह अनेक विकास कामे लागणार मार्गी

आमदार आतोनियो वास यांनी कुठ्ठाळीच्या विकासासाठी कसली कंबर

दैनिक गोमन्तक

वास्को: केसरव्हाळ झऱ्याचे पुनरुज्जीवन आणि देखभाल लवकरच केली जाणार असून गोवा पर्यटन खात्याकडून पाहणी केली.झऱ्याची पाहणी केली. कुठ्ठाळीचे नवनिर्वाचित आमदार आतोनियो वास यांनी कुठ्ठाळीच्या विकासासाठी कंबर कसली असून त्यांनी समाजपयोगी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

(MLA Antonio Vasis promised for the development of cortalim)

मुख्य म्हणजे गेले कित्येक वर्षे दुर्लक्षित झालेला केसरव्हाळ येथील झऱ्याचे सुशोभिकरण करण्याला महत्त्व देताना त्यांनी गोवा पर्यटन खात्याकडे पाठपुरावा करून या झऱ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

सध्या या ठिकाणी अनेक अनैतिक कृत्ये घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी तसेच येथे पोलीस गस्त सुरू करण्यासंबंधी तसेच केसरव्हाळ झरा हा नैसर्गिक झरा असून त्याचे अस्तित्व टिकवणे फार गरजेचे आहे. झऱ्याची देखभाल होत नसल्याने झऱ्याचे सौंदर्य नष्ट झाले आहे. झऱ्याचा परिसर झाडाझुडपाणी व्यापलेला आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येतात पण त्यांना पाहिजे तशी मजा घेता येत नसल्याने पर्यटक तेथून लवकरच काढता पाय घेतात.

दरम्यान कुठ्ठाळीच्या नवनिर्वाचित आमदार आंतोनियो वास यांनी या झऱ्याचे सौंदर्य परत आणण्यासाठी गोवा पर्यटन खात्याकडे पाठपुरावा केला आहे. हल्लीच पर्यटन खात्यात झालेल्या बैठकीत आमदार वास यांनी पर्यटन मंत्री रोहन खवटे यांच्याकडे या झऱ्याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यासंबंधी त्यांना खवटे यांनी हिरवा कंदील दाखवून केसरव्हाळ झरा पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले.

पर्यटन खात्याकडून तीन वेळा या झऱ्याची पाहणी आमदार अंतोनियो वास यांच्याबरोबर केली. तर आज सकाळी पर्यटन विभागाचे सल्लागार अभियंते आणि अधिकाऱ्यांनी केसरव्हाळ झऱ्याला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यटन विभागाचे सल्लागार म्हणून पुणे स्थित फोर्थ डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मीकांत धर्माजी, व्यवस्थापक लक्ष्मीकांत तुपदाले, तसेच सहाय्यक व्यवस्थापक सर्वेश नाईक यांनी केसरव्हाळ झर्याची पाहणी केली.

यावेळी त्यांना आमदार आंतोनियो वास यांचे स्वीस सचिव एडि फर्नांडीस, स्थानिक विन्सेंट पॅरेरा तसेच दिलीप बांदोडकर यांनी झऱ्याविषयी माहिती दिली. त्यानुसार सदर सल्लागार झऱ्याचा अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार लवकरच केसरव्हाळ झरायला पुनरुज्जीवन मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT