Nuvem Canacona Goa  Dainik Gomantak
गोवा

Canacona: 46 वर्षे शेव-चिवडा विकून पै पै जमा केली, निवाऱ्यासाठी नुवेत झोपडी उभारली पण अज्ञातांनी उद्धवस्त केली

झोपडी उद्धवस्त केल्याने तेवर सध्या बायकामुलांसह भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

Pramod Yadav

Nuvem Canacona Goa: निवाऱ्यासाठी स्वत:चे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, त्यासाठी आयुष्यभर कष्ट उपसण्याची तयारी असते. लोकं पै पै जोडून स्वप्नातील घर बांधतात. पण, समजा कोणी तब्बल 46 वर्षे शिव-चिवडा विकून पैशांची बचत केल्यानंतर झोपडी उभारली आणि ती झोपडी काही समाजकंटकांनी उद्धवस्त केली. तर त्याची भावनिक घालमेल काय असेल असा विचार देखील अंगावर काटा उभा करणारा आहे.

पण, नुवे, काणकोण येथे अशी घटना घडली असून, पोलिसांनी देखील सुरूवातीला या प्रकरणाकडे दुर्लेक्ष केले.

शादायंदी परमान तेवर हा व्यक्ती मूळचा तामिळनाडू येथील रहिवाशी असून, तो मागील 46 वर्षे सत्तरीत शेव-चिवडा, कुरकुरे विकून उदरनिर्वाह करत आहे. दरम्यान, 11 वर्षांपूर्वी त्याने नुवे, काणकोण येथे जमिनीचा तुकडा विकत घेतला. या जमिनीवर त्याने स्वत:साठी तात्पुरता निवारा उभा केला. मात्र, काही समाजकंटकांनी त्याचा हा निवारा उद्धवस्त केला आहे.

शादायंदी तेवर यांनी याप्रकरणी 7 एप्रिल 2023 रोजी पोलिसांत धाव घेतली मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची दखलच घेतली नाही. झोपडी उद्धवस्त केल्याने तेवर सध्या बायकामुलांसह भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

तेवर यांनी एका जमीनदाराकडून जमीन खरेदी केली, त्याची सेल डीड, म्युटेशन व पार्टीशन नावावर झाले. मात्र, नुवे येथील दोन व्यक्तींनी त्याला त्या जमिनीत झोपडी उभारण्यास आडकाठी केली.

दरम्यान, शादायंदी परमान तेवर दारोदारी फिरून शेव-चिवडा, कुरकुरे असे खाद्यपदार्थ विकून उदरनिर्वाह करतात. मागील 46 वर्षांपासून त्यांनी पै पै जोडून जमीन खरेदी केली व त्यावर झोपडी उभारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT