Miramar beach business dispute Dainik Gomantak
गोवा

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Miramar beach business dispute: मिरामार किनाऱ्यावर व्यवसायाच्या जागेवरून गुरुवारी मध्यरात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मिरामार किनाऱ्यावर व्यवसायाच्या जागेवरून गुरुवारी मध्यरात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० ते १२.३०च्या सुमारास मिरामार किनाऱ्यावर व्यवसायाच्या जागेवरून दोन गटांत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांवर चाव्या तसेच घरातील भांड्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिल्या गटात ढवळी-ताळगाव व केवणे-ताळगाव येथील पुष्पांजली नारझारी, हलिमा काद्रोळी, आयेशा काद्रोळी आणि मलिक काद्रोळी यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात लूर्ड्स वाडो, ताळगाव येथील नासीर शेख, मोईनुद्दीन शेख, मुन्नी बी शेख आणि जावेद शेख यांचा समावेश आहे.

संशयितांना नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक महेश नाईक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

खरी कुजबुज: सुभाष यांचा कुंकळ्ळीत वाढला वावर!

VIDEO: "विराटने आणि मी आधीच ठरवलं होतं..." रोहित शर्माचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा, पाहा नेमकं काय म्हणाला 'हिटमॅन'

BJP MGP Alliance: फोंड्याचा निर्णय चर्चा करूनच, सद्यस्थितीत भाजप–मगो युती गरजेची- दामू नाईक

SCROLL FOR NEXT