Rape Case Dainik Gomantak
गोवा

Rape Case: अपहरण, बलात्कारप्रकरणी आरोपीला पोक्सोखाली 10 वर्षे कैद

दक्षिण गोव्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावरील बलात्कारप्रकरणी पणजी विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला 10 वर्षांची कैद व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

दैनिक गोमन्तक

Rape Case: दक्षिण गोव्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावरील बलात्कारप्रकरणी पणजी विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी आरोपीला 10 वर्षांची कैद व एक लाख रुपये दंड अशी ठोठावली आहे.

न्यायालयाने त्याला अपहरण तसेच बलात्कारप्रकरणी संशयिताला दोषी ठरवले होते. त्याला अपहरणप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंड तसेच तो न भरल्यास एक महिना सश्रम कारावास, पोक्सो कलम 4 खाली 10 वर्षे कैद व 1 लाख रुपये दंड व तो न भरल्यास 2 महिने सश्रम कारावास.

तसेच पोक्सो कलम 8 खाली 5 वर्षे कैद व 50 हजार रुपये सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा त्याने एकाचवेळी भोगायच्या आहेत. विशेष सरकारी वकील अर्चना भोबे यांनी पोलिसांतर्फे बाजू मांडली तर एस. लंवदे यांनी आरोपीतर्फे युक्तिवाद केला.

आरोपीने 31 मार्च 2019 रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान पीडित मुलीचे अपहरण केले व तिला पालकांच्या परवानगीशिवाय निर्जनस्थळी ठेवले होते. त्यानंतर तिला एका हॉटेलात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले होते. तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला तरी सापडली नाही त्यामुळे अखेर तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

या घटनेची माहिती मुलीने दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीस बोलावून त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध अपहरण व बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यावरील सुनावणीवेळी 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांनी दिलेल्या जबानीचा संशयिताने त्याच्यावरील आरोपांचा इन्कार केला होता.

गंभीर आणि घृणास्पद गुन्हा

या खटल्यावरील निवाडा देण्यापूर्वी पीडित मुलीची जबानी विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंद करण्यात आली होती. त्यांची साक्ष यावेळी घेण्यात आली. हॉटेलातील रूम बॉय, हॉटेलचा मालक यांची साक्ष व वैद्यकीय अहवाल यावरून आरोपीचा गुन्हा सिद्ध होत आहे.

त्याने केलेला गुन्हा गंभीर व घृणास्पद आहे. या घटनेमुळे पीडित मुलगी तसेच तिच्या कुटुंबाला आघात सहन करावा लागला, याचा विचार करून त्याला ही शिक्षा ठोठावण्यात येत असल्याचे निरीक्षण निवाड्यात करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT