Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावमधून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली कर्नाटकात, आरोपीला अटक

Margao Girl Abduction: मडगावच्या मोतीडोंगर येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीला मडगाव पोलिसांनी कर्नाटकातील कुलबर्गा येथून शोधून काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगावच्या मोतीडोंगर येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीला मडगाव पोलिसांनी कर्नाटकातील कुलबर्गा येथून शोधून काढले. या मुलीचे अपहरण करणाऱ्या परशुराम अरियार (२२) याला पोलिसांनी अटक केली. त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, संशयितांची सध्या पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

रविवारी (ता.२७) सायंकाळी ६.३० वा.च्या दरम्यान अज्ञाताने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची पीडितेच्या आईने मडगाव पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १३७ (२) व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत ही तक्रार नोंद करून घेतली होती.

संशयित त्या मुलीला घेऊन कर्नाटकात पळून गेल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. नंतर पोलिसांनी सापळा रचून संशयिताला जेरबंद करताना, त्या मुलीचीही सुटका केली. पुढील पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT