Runaway child delhi goa Dainik Gomantak
गोवा

Goa: वडिलांनी केली मारहाण, रागाच्या भरात दिल्लीच्या चिमुकल्याने गाठला गोवा; सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे सापडला थिवी येथे

Child Delhi Goa: वडिलांनी काही कारणास्तव मारबडव केल्याने रागाच्या भरात दिल्लीतून घरातून पळून रेल्वेने गोव्यात निघालेला एक अल्पवयीन मुलगा रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे थिवी येथे सापडला.

Sameer Panditrao

मडगाव: वडिलांनी काही कारणास्तव मारबडव केल्याने रागाच्या भरात दिल्लीतून घरातून पळून रेल्वेने गोव्यात निघालेला एक अल्पवयीन मुलगा रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे थिवी येथे सापडला.

१३ वर्षांच्या या मुलाला बाल मदत केंद्राच्या माध्यमातून ‘अपना घरा’त ठेवले आहे. त्याच्या पालकांना यासंबंधी कळविण्यात आले असून, ते गोव्यात पोहोचल्यानंतर या मुलाला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

हा मुलगा सावंतवाडी पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेत आला. भांबावलेला असल्याने व सोबत कुणीही नसल्याने या जवानांना संशय आला. त्याची विचारपूस केली असता, त्याने आपण घरातून पळून आल्याचे सांगितले. मागाहून त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडून त्या मुलाला अपना घरात ठेवण्यात आले.

नावेलीत मुलाकडून वडिलांना मारहाण

कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या मुलाविरुद्ध तसेच सुनेविरुद्ध मडगाव पोलिस स्थानकात मारहाण केल्याची तक्रार केली आहे. ही घटना मोडी-नावेली येथील शनि मंदिराजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोडी-नावेली येथील देवेंद्रकुमार प्रसाद यांच्या तक्रारीवरून मडगाव पोलिसांनी तक्रारदाराचा मुलगा सुनीलकुमार व त्याची पत्नी विनिता यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी मडगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT