रोहन खंवटे Dainik Gomantak
गोवा

बेती विठोबा रखुमाई देवस्थानतर्फे मंत्री रोहन खंवटे यांचा सत्कार

रोहन खंवटे यांनी देवस्थानच्या महिला समितीच्या कार्याची प्रशंसा केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: बेती येथील विठोबा रखुमाई देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त देवस्थान समितीतर्फे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. खंवटे यांनी देवस्थानच्या महिला समितीच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी देवस्थान समितीतर्फे अजय च्यारी, शैलेश गावस, विठ्ठल पवार, शाबी नाईक मिरसंगकर, प्रशांत सावंत, पुजारी गणपत हेगडे, शरदचंद्र नाईक, निशिकांत भोसले, नवनाथ पेडणेकर व रवींद्र गावकर यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत 12 ते 14 वयोगटात ममता गावस, अक्षदा हळर्णकर व यिशिका पुरोदकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे प्राप्त केली. 15 वर्षांवरील गटात हरिश्‍चंद्र च्यारी, शोभा नाईक व रश्मिता नाईक यांनी अनुक्रमे पहिली तीन बक्षिसे पटकावली. फुलांची वेणी बनवण्याच्या स्पर्धेत प्रेमा हळर्णकर, भारती सुर्लीकर व प्रगती सुर्लीकर यांनी पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस मिळाले. हार गुंफणे स्पर्धेत शोभा नाईक, श्‍वेता नाईक व वनिता नाईक यांनी प्रथम तीन क्रमांकाची बक्षिसे प्राप्त केली.

अखिल गोवा फुगडी स्पर्धेचे विजेतेपद रवळनाथ फुगडी ग्रुप, साल्वादोर द मुंद (किटला) यांनी पटकावले. खेडे-सावईवेरेच्या दत्तात्रय महिला मंडळाने दुसरे तर राष्ट्रोळी सिद्धीविनायक, जोसवाडो-सुकुर यांना तिसरे बक्षीस प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT