Ravi Naik Gomantak Digital Team
गोवा

Minister Ravi Naik : स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची महती विद्यार्थ्यांना समजावी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Revolution Day : पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी अपार कष्ट घेतले. या कष्टाचे फळ आज आम्ही मुक्त गोव्यात चाखत आहोत. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची महती आजच्या विद्यार्थ्यांना व्हायला हवी, असे उद्‌गार‌ फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी काढले.

फोंड्यातील क्रांती मैदानावर आयोजित क्रांतीदिन सोहळ्‍यात नाईक यांच्यासमवेत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रोहिदास नाईक, गोविंद चिमुलकर, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, नगरसेवक आनंद नाईक, रूपक देसाई, फोंडा अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई, विभागीय पोलिस अधिकारी आशिष शिरोडकर

लष्करी अधिकारी, माजी शिक्षणाधिकारी व्ही. डी. नाईक, माजी मुख्याध्यापक राम कुंकळकर, माजी सरपंच दादी नाईक, कुर्टी-खांडेपार सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य आणि शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी फोंडा तालुक्यातील विविध विद्यालयांतील मुलांनी समरगीते सादर केली. नृत्याचा आविष्कारही विद्यार्थ्यांनी घडविला.

जाती, धर्माच्या भिंती पाडुया!

आपला देश हा सर्व धर्मांना आणि जातींना सोबत घेऊन जाणारा आहे. आज जाती, धर्मांच्या नावाखाली वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जाती-धर्मांच्या या भिंती पाडून सर्वांनी एकसंध राहून एकजुटीने देशाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले तर देश समृद्धीच्या दिशेने नक्कीच जाईल, असा विश्‍‍वास रवी नाईक यांनी व्‍यक्त केला.

आपला देश आणि गोवा मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा त्याग केलाय. प्रसंगी संसारावर तुळशीपत्र ठेवले. अपार कष्टातून आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले असून ते अबाधित ठेवण्याची आज गरज आहे. गोव्याच्या मुक्तिसंग्रामाची महती विद्यार्थ्यांना समजणे आवश्‍यक आहे.

रवी नाईक, फोंड्याचे आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT