Chimbel Junction  Dainik Gomantak
गोवा

Chimbel Junction : चिंबल जंक्शनवर उड्डाणपूल लवकर उभारा

सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश कांब्राल यांची कंत्राटदाराला सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Chimbel Junction : रायबंदर - चिंबल जंक्शनवर जीवघेणे अपघातांचे सत्र सुरू असून नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. जंक्शनवरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. कंत्राटदाराला बोलवून उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

जंक्शनवर उतरण संपताच येथे वळण असल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडत आहे. हे रोखण्यासाठी येथे सिग्नल, गती कमी करण्यासाठी उतरणीवर तीन ठिकाणी रंबलर्स घालण्यात आला आहेत. तरी देखील अपघात होत असून ही चिंतेची बाब आहे. हे वळण टाळण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. परंतु काही कारणात्सव हा प्रलंबित राहिला आहे.

उड्डाणपुलासाठी बांधण्यात आलेल्या खांबांच्या चाचणी, परीक्षणाचे काम सध्या कंत्राटदाराकडून केले जात आहे. बांधकामासाठी लागणारे लोखंडी साहित्य तयार करण्यासाठी येथे कारखाना टाकण्यासाठी जागेची आवश्‍यकता आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT