Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic : ...तोपर्यंत गोवेकरांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागेल; मंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्टच सांगितलं

मंत्री नीलेश काब्राल यांनी वाहतूक समस्या असल्याचे केले मान्य

दैनिक गोमंतक

आज सकाळी पणजी ते दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या झुआरी पुलावर दोन चारचाकी वाहने धडकली. यामुळे मुख्य रस्त्यावर कुठ्ठाळीपर्यंत तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे गोव्यातील वाहतूक समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी भाष्य केले आहे.

(Minister Nilesh Cabral has informed that the traffic problem in Goa will reduce soon )

मिळालेल्या माहितीनुसार आज सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी माध्यमांशी संवाद साधला. व म्हणाले की, सध्या राज्यातील रस्ते विकास कामे वेगाने सुरु आहेत. त्यामुळे काही पर्यायी मार्ग बंद झाल्याने मुख्य मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. आणि यामुळेच ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढील काही दिवसात विकास कामे पुर्ण झाल्यानंतर ही समस्या संपेल असे ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नेमका किती कालावधी या कामांना लागणार आहे. हे मात्र सांगितलं नाही.

यावेळी मंत्री काब्राल यांनी अनेक ठिकाणी वाहतूक समस्या जाणवत असल्याचे मान्य केले. मात्र यावर उपाय ही शोधले आहेत. त्यामुळे या समस्या संपणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच यानंतर वाहतूकीसाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन वाहतूक शिस्तीसाठी देखील प्रयत्नशिल असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गोवेकरांना मंत्री काब्राल यांनी म्हटल्याप्रमाणे रस्त्यांची विकास कामे संपेपर्यंत वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे.

...म्हणून राष्ट्रीय महामार्गावर चार तास चक्का जाम 

पणजीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या झुआरी नदीवरील पुलावर आज ( सोमवारी ) सकाळी किरकोळ अपघात झाला. या अपघातात दोन चारचाकी धडकल्याचा प्रकार घडला. विशेष क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला काढण्यापूर्वी 45 मिनिटे वाहतूक राष्ट्रीय पुलावर ठप्प झाली होती. याचा परिणाम म्हणून कुठ्ठाळी मुख्य रस्त्यावर चार तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT