Bombay High Court Hearing On Mining Dainik Gomantak
गोवा

Mining Transport: ग्रामस्थांच्या विरोधानंतर पिळगावात खनिज वाहतूक पर्यायी मार्गाने! खाण खात्याचे स्पष्टीकरण; हायकोर्टात आज सुनावणी

Bombay High Court Hearing On Mining: सरकारने खाणपट्ट्याला मंजुरी दिल्यानंतर खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्‍यक परवाने घेतल्यानंतर त्याला कोणीही अडवू शकत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारने खाणपट्ट्याला मंजुरी दिल्यानंतर खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्‍यक परवाने घेतल्यानंतर त्याला कोणीही अडवू शकत नाही. ही खनिज वाहतूक ई-लिलाव खाणपट्ट्यांमधील नाही तर वेदांताला दिलेल्या खाणपट्ट्याची आहे. कंपनीने सर्व परवाने घेतलेले आहेत. पिळगाव ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून खनिज वाहतुकीला विरोध केल्याने पर्यायी रस्त्यावरून ही वाहतूक होत असल्याचे स्पष्टीकरण खाण खात्याने केले आहे. याचिकादाराच्या वकिलांनी उत्तरास वेळ घेतल्याने ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी (१३ फेब्रुवारी) ठेवली आहे.

वेदांता कंपनीने खनिज वाहतुकीसाठी पर्यायी रस्‍त्यासाठी परवानगी मागितली, त्यावर पोलिस, पीडब्ल्यूडी, वाहतूक, डिचोली उपजिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व खाण खात्याची संयुक्त बैठक झाली त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरण (Environment) परवाना ज्या मार्गासाठी देण्यात आला आहे, त्याच्याव्यतिरिक्त सरकारने परवाना दिलेल्या इतर मार्गावरून वाहतूक करता येत नाही, असा अर्थ होत नाही. ज्या खनिज वाहतूक मार्गाबाबत प्रश्‍न उपस्थित केला गेला आहे तो सार्वजनिक रस्ता आहे. या मार्गावरून वाहतूक करताना आवश्‍यक ती उपाययोजना व काळजी घेण्यात येत आहे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देखरेख केली जात आहे. या वादग्रस्त मार्गावर मंडळाने प्रदूषण देखभाल यंत्रणा बसविली आहे. त्यासंदर्भातची माहिती याचिकादाराला कळवण्यात आली आहे.

दिवसा ट्रकांच्या खेपा कमी!

या खनिजवाहू ट्रकांमुळे हा पर्यायी रस्ता धोकादायक असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे दिवसा ट्रकच्या खेपा कमी करून रात्री वाहतूक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाला आहे. या मार्गाच्या कक्षेत काही अवघीच घरे आहेत. रात्री व दिवसाच्या वाहतुकीमुळे ट्रकांच्या खेपा वाढण्याऐवजी विभागून जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT