Goa Mines News Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील खाण लीज लिलावाची घोषणा म्हणजे जुमला !

पर्यावरणप्रेमींची मुख्यमंत्र्यांवर टीका: पंचायत निवडणुकीसाठी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील सर्व खाणींचा लिलाव करून लवकरच त्या सुरू करणार, ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह असली तरी ती केवळ तोंडाला पाने पुसण्यासाठीच आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे. पंचायत निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना भूलवण्यासाठी केलेला हा नवा जुमला असल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

या घोषणेची खिल्ली उडवताना गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष क्लॉड अल्वारिस म्हणाले, जर त्यांना खाणींचा लिलाव करायचा होता, तर त्यांनी 2018 मध्येच हा निर्णय का घेतला नाही? अशी विचारणा करून 2022 ची वाट पाहत चार वर्षे फुकट का घालवली, असा प्रश्नही त्यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतर गोव्यात सर्व खाणींचा लिलाव करणार, अशी घोषणा केली आहे. मात्र त्याकडे पर्यावरणप्रेमी साशंकतेनेच पाहत आहेत.

अल्वारिस म्हणाले, प्रमोद सावंत जर खाणींबाबत खरेच गंभीर असते, तर त्यांनी हे खाते स्वतःकडे न ठेवता खाणीची माहिती असलेल्या कुणा तज्ज्ञांकडे दिले असते. प्रमोद सावंत म्हणजे मनोहर पर्रीकर नव्हेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पर्रीकर हे धातू शास्त्रातील आयआयटी पदवीधर होते. त्यांना धातूंबद्दल माहिती होती. प्रमोद सावंत होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ते जास्तीतजास्त चांगले आरोग्यमंत्री होऊ शकतील. त्यांनी खाण खाते सांभाळणे हाच एक मोठा विनोद आहे. येत्या चार वर्षात खाण लिजधारक न्यायालयात जाऊन हा निर्णय कसा रेंगाळत ठेवता येऊ शकतो हेच पाहणार. त्यामुळे पुढच्या चार वर्षातही खाणी परत सुरू होणार ही फक्त कल्पनाच ठरेल, असे ते म्हणाले.

पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गावस म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्यावेळी तीन महिन्यात महामंडळ स्थापन करून खाणी सुरू करू, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा नवीन जुमला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT