Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाणव्याप्त भाग संकटात; ‘जिल्हा मिनरल’तर्फे खात्याला पाठवलेल्या प्रस्तावाची घ्या माहिती

Mining Affected Villages: खाण लीज क्षेत्रामुळे खाणव्याप्त भागातील काही गावांचे अस्तित्व संकटात आले असतानाच, आता खाणव्याप्त भागातील परिणाम क्षेत्र कमी करण्याच्या शासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

District Mineral Foundation Proposes to Shrink Mining Impact Zone to Save Affected Villages In Goa

डिचोली: खाण लीज क्षेत्रामुळे खाणव्याप्त भागातील काही गावांचे अस्तित्व संकटात आले असतानाच, आता खाणव्याप्त भागातील परिणाम क्षेत्र कमी करण्याच्या शासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा मिनरल फाऊंडेशनतर्फे तसा प्रस्तावही खाण आणि भूगर्भ खात्याला दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

गव्हर्निंग कौन्सिलची मान्यता मिळाल्यानंतरच हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. मिनरल फाऊंडेशनचा प्रस्ताव सरकारने विचारात घेऊन त्याची अंमलबजावणी केली, तर भविष्यात गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याचा अधिक धोका आहे.

खाणव्याप्त भागातील परिणाम क्षेत्र कमी केले, तर भविष्यात खाणव्याप्त भागातील गावांसमोर मोठे अनिष्ट संकट उभे राहून गावची गावे उद्‌ध्वस्त होणार, अशी भीती पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्याचे खाण परिणाम क्षेत्र १५ किलोमीटर असे आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने खाण परिणाम क्षेत्र ५ किलोमीटर अंतराने कमी करून दहा किलोमीटर असे करावे, असा प्रस्ताव जिल्हा मिनरल फाऊंडेशनने खाण खात्याला दिला असल्याची माहिती आहे. मिनरल फाऊंडेशनचा हा प्रस्ताव अक्षरशः दिशाभूल करणारा आणि भविष्यातील दुष्परिणामांना आमंत्रण ठरू शकणारा असा आहे, असे मत पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

आधीच खाण लिज क्षेत्रामुळे खाणव्याप्त काही गावांचे अस्तित्व संकटात आहे. डिचोलीतील मुळगाव, शिरगावसह अडवलपाल आदी काही गावांमध्ये असंतोष खदखदत आहे. खाण लिज क्षेत्रामधून घरेदारे, धार्मिक स्थळे, शेती-बागायती आणि नैसर्गिक जलस्रोत लिज क्षेत्रातून बाहेर काढावेत, असा टाहो खाणव्याप्त भागातील जनता फोडत आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काय?

खाण परिणाम क्षेत्राचे अंतर कमी केले म्हणून खाणव्याप्त गावांची संकटातून मुक्तता अजिबात होणार नाही. उलट अधिक धोका वाढणार आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे घेता येईल. खाणव्याप्त अडवलपाल गावाच्या हद्दीपासून काही अंतरावर अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.

संपूर्ण उत्तर गोव्याची तहान भागविणारा हा प्रकल्प अडवलपाल येथील खाण परिणाम क्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतराच्या जवळपास आहे. दुसऱ्या बाजूने शिरगाव खाण आहे. खाण परिणाम क्षेत्राचे अंतर कमी केले, तर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भवितव्य काय, असे अडवलपालचे माजी सरपंच प्रेमानंद साळगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT