Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: सोमवारपासून सावर्डे, सांगे परिसरात खनिज वाहतूक

Goa Mining: वल्लभ दळवी : मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ट्रकमालक राजी

दैनिक गोमन्तक

Goa Mining: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून सोमवारपासून सावर्डे व सांगे भागातील खनिज वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे सेझा गोवा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी यांनी सावर्डे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी,स्वप्नेश नाईक व इतर सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ.सावंत यांच्यासमवेत ३१ रोजी संघटनेची बैठक झाली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ट्रक मालकांच्या काही मागण्या खनिज वाहतूक सुरू झाल्यानंतरच पूर्ण करणार, असे आश्‍वासन या बैठकीत दिले होते. त्यांच्या आश्‍वासनावर विश्वास ठेवून सर्व ट्रक मालकांनी सोमवारपासून ही वाहतूक सुरू करण्यास होकार दिल्याचे दळवी यांनी सांगितले.

राज्यातील खनिज व्यवसाय बंद पडल्याने खाण अवलंबितांना विविध समस्यांनी ग्रासले असल्याने सरकारने हा व्यवसाय तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे ट्रक मालकांनी सांगितले .सध्या फक्त लिलाव झालेल्या खनिजाची वाहतूक होते.

त्यामुळे खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जास्त काम मिळत नसल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो असून हा व्यवसाय कायदेशीररित्या लवकर सुरू करावा,अशी मागणी यावेळी ट्रक मालकांनी केली.

खाण बंदीमुळे त्रस्त असलेल्या खाण अवलंबितांना सध्या आर्थिक संकटाने घेरले आहे.त्यामुळे सरकारने तातडीने खाण व्यवसाय पूर्ववत सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत,अशी मागणीही ट्रक मालकांनी केली.

ट्रक मालक अडचणीत सापडले असल्याने वाहतूक दर वाढवून द्यावा, यासाठी संघटनेचे प्रयत्न होते व याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक झाली. सध्या ट्रक बंद असल्याने ज्या वाहनांचे फिटनेस संपले आहे, त्यांना दिवसाकाठी पन्नास रुपयांचा दंड भरावा लागतो, तो कमी करून मुख्यमंत्री सावंत यांनी फक्त पाच रुपये करणार असल्याचे सांगितले असून ग्रीन टॅक्सही माफ करण्याचे आश्वासन दिले आहे,असेही वल्लभ दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

SCROLL FOR NEXT