Court Dainik Gomantak
गोवा

Shirgao: गाळ उपसा खर्च कुणी करायचा? शिरगावातील प्रश्नावर न्यायालय सुनावणार आदेश

Shirgao soil extraction: शिरगाव गावात खाण कंपन्यामुळे तेथील शेजमिनी तसेच ओढ्यांमध्ये खनिजमाती गाळ जाऊन पडिक झाल्या होत्या.

Sameer Panditrao

पणजी: शिरगाव गावातील शेतजमिनी व ओढ्यांमधील खनिजमाती गाळ काढण्यासाठी आलेला खर्च संबंधित खाण कंपन्यांनीच करावा यासंदर्भात सरकारने जारी केलेल्या आदेशाला खाण कंपन्यांनी आव्हान दिले होते त्यावरील सुनावणी पूर्ण होऊन आदेश येत्या मंगळवारी (२८ जानेवारी) ठेवला आहे.

शिरगाव गावात खाण कंपन्यामुळे तेथील शेजमिनी तसेच ओढ्यांमध्ये खनिजमाती गाळ जाऊन पडिक झाल्या होत्या. त्यामुळे हा गाळ उपसण्यासंदर्भात तसेच नुकसान भरपाईसंदर्भात उच्च न्यायालयाने निवाडा दिला होता.

गोवा खंडपीठाने हा खनिजमातीचा गाळ उपसण्यासाठी येणारा खर्च करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी तो केला नाही. सरकारने हा गाळ खासगी एजन्सीमार्फत उपसला होता. त्यासाठी आलेल्या खर्चाची अर्धी रक्कम सरकारने सोसली होती.

उर्वरित अर्धी रक्कम खान कंपन्यांनी जमा केलेल्या डिस्ट्रिक्ट मिनरल फंडातून (डीएमएफ) खर्च करण्याची विनंती केली होती. सरकारने हा खर्च खाण कंपन्यांनीच करावा यासंदर्भातचा आदेश जारी केला होता त्याला विरोध करणारा अर्ज शिरगावमधील तीन खाण कंपन्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT