Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

गोवा डेअरीचे दूध 4 रुपयांनी महागणार

4 रुपयांपैकी 2 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्याला, तर 2 रुपये गोवा डेअरीला

दैनिक गोमन्तक

गोवा डेअरीचे दूध 4 रुपयांनी महागणार होणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. सरकारकडून दरवाढीस मान्यता मिळाल्याचे सांगत ते म्हणाले की 4 रुपयांपैकी 2 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्याला, तर 2 रुपये गोवा डेअरीला मिळणार आहेत. या घोषणेमुळे गोव्यातील शेतकऱ्याला दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. गोवा डेअरी (Goa Dairy) 16 एप्रिल पासून दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती देखील यापूर्वी देण्यात आली होती.

निवडणुका संपल्यानंतर आता इंधन दरवाढीची झळ जनतेला बसू लागली असतानाच सर्वसामान्यांच्या घरात कायम वापरल्या जाणाऱ्या दुधाचे दरही भडकल्याने आम आदमी हतबल झाला आहे. महिन्याभरापूर्वी अमूलच्या दरात लिटरमागे दोन रुपये वाढ झाल्यानंतर गोवा डेअरीनेही दूध दराचा प्रस्ताव सहकार निबंधकांकडे पाठवला. त्यातच महाराष्ट्रातून गोव्यात (goa) येणाऱ्या गोकुळ दुधाच्या (Milk) दरात तीन रुपये प्रतिलिटर वाढ लागू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले प्रती लिटर तीन रुपये आम्हाला द्या, एक रुपया नकोच, असे राज्यातील दूध उत्पादकांनी गोवा डेअरी व्यवस्थापकांना काही दिवसांपूर्वी सुनावले होते. दूध उत्पादकांच्या दरवाढीसंबंधी बोलताना राज्यातील दूध उत्पादकांना संपवण्याचा प्रकार गोवा डेअरीकडून होत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला होता.

यावेळी दूध उत्पादक अनुप देसाई, संजीव कुंकळ्येकर, नीतिन प्रभुगावकर, विश्‍वास सुखटणकर, वैभव परब व प्रमोद सिद्धये आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT