Milind Naik

 

Dainik Gomantak 

गोवा

सेक्स स्कॅंण्डल प्रकरण: मिलिंद नाईकांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मिलिंद नाईक यांनी मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी गोवा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

सेक्स स्कॅण्डलमध्ये गुंतल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्यानंतर तसेच संकल्प आमोणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा आज रात्री उशिरा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहीती, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

मुरगाव येथील वासनाकांड प्रकरणाचे पर्यावसान नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या राजीनाम्यात झाले आहे. काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांनी आज काही ध्वनिफिती, चित्रफिती व व्‍हॉट्‌सॲप संदेशांच्या पुराव्यांसह मंत्री नाईक यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली. यानंतर विलक्षण गतीने राजकीय चक्रे फिरू लागली. हे प्रकरण कुजत ठेवले तर भाजपाला येत्या निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना आला आणि नाईक यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आज तर पक्षाचे संघटनमंत्री बी. एल. संतोष उद्या तातडीच्या गोवा भेटीवर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावित गोवा भेटीआधी काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT