Migrant Workers Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत परप्रांतीय मजुरांची समस्या कायम

Dicholi : डिचोलीतील नागरिकांना कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील मजुरांमुळे असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Dicholi: शहरातील बसस्थानक परिसरात परप्रांतीय मजूर घोळक्याघोळक्याने उभे राहत असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसराला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. भर रस्त्यावर दाटीवाटीने राहणाऱ्या या मजुरांमुळे वाहतुकीसही अडथळा होतो. एखादेवेळी अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बऱ्याच वर्षांपासून डिचोलीत परप्रांतीय मजुरांची समस्या कायम आहे. कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील मिळून ५०० हून अधिक मजूर बसस्थानक परिसरात दाटीवाटीने उभे राहिलेले दिसून येतात.

रोज सकाळी साधारण साडेआठ वाजल्यापासून हे मजूर बसस्थानक परिसरात येण्यास सुरुवात होते. पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकत असल्याने येथे स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होतो.

पोलिसांकडून कारवाई

डिचोलीत नवीन बसस्थानक बांधण्याचे काम चालू असल्याने तात्पुरते पर्यायी बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकावर बसगाड्या आत-बाहेर घेताना बसस्थानकाबाहेर थांबणाऱ्या मजुरांचा मोठा अडथळा ठरत होता. त्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यात या मजुरांना पोलिसांनी तेथून हुसकावून लावले होते. मजुरांची धरपकडही सुरू केली होती. त्यावेळी गर्दी कमी झाली होती.

परत होते गर्दी

पोलिसांच्या कारवाईनंतर या मजुरांनी आपला मोर्चा बसस्थानकाच्या मागच्या बाजूने वळविला होता. त्यामुळे गेले काही महिने बसस्थानक परिसर काहीसा मोकळा वाटत होता. मात्र, आता हे मजूर परत बसस्थानकासमोर राहत असल्याने सध्या बसस्थानकाच्या मागच्या बाजूने तसेच बसस्थानकासमोर भर रस्त्यावर गर्दी होत आहे.

अनर्थ घडण्याची भीती

बसस्थानकाबाहेर दाटीवाटीने उभे राहणाऱ्या या मजुरांमुळे सकाळी साधारण एक-दीड तास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मजुरांच्या गर्दीमुळे प्रवासी बसगाड्या आतबाहेर घेताना एखादेवेळी मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या मजुरांना तेथून कायमचे हुसकावून लावावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

SCROLL FOR NEXT