Panaji roadwork closure problem
पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत मध्य पणजीत तांबा इमारतीजवळील बँक ऑफ बडोदासमोरील रस्ता बंद केल्यामुळे वाहनधारकांना वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. मात्र, सध्या जी कामे सुरू आहेत त्यामुळे रस्ता बंद होणार असेल तर इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) ते जनतेसाठी जाहीर करायला हवे होते.
पण तसे सध्या काहीही होत नाही, त्यामुळे पणजीकर असो किंवा पणजीत येणारा पर्यटक अथवा गोमंतकीयांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते बंद करताना त्याची कल्पना वाहनधारकांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी जाहिरातींचा किंवा इतर माध्यमांचा वापर केला जातो. मात्र, मध्य पणजीत गीता बेकरीकडून आल्तिनोकडे जाण्यासाठी तांबा इमारतीच्या डाव्याबाजूने जाणे सोपे असते; परंतु आता तो रस्ता मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरच्या कामासाठी खोदकाम केल्याने बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे वाहनधारकांना पुढे वुडलँड शोरूम येथून वाहतुकीचा नियम मोडून साल्वादोर द मुंद हॉटेलसमोरून बँकेपर्यंत वाहन आणावे लागत आहे. तेथून मग त्यांना समोर भोसले कॅफेकडे किंवा उजव्या बाजूला आल्तिनोकडे जाणाऱ्या मार्गाकडे वाहन वळवावे लागते.
वाहनधारकांसाठी किमान वाहने कोणत्या मार्गाने वळविता येतील, हे दाखविण्यासाठी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे; पण तेही लावले जात नाहीत. याशिवाय महानगरपालिका ते आझाद मैदान चौकापर्यंतचा रस्ता दुतर्फा वाहतुकीस खुला करणे गरजेचे आहे.याठिकाणी दोन्ही बाजूला चारचाकी वाहनांचे पार्किंग असते, ते हटवून त्याठिकाणी दुतर्फा वाहतूक सुरू ठेवल्यास वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.