Michael Lobos and Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Panchayat Election : मायकल लोबो यांचा चर्चेतील गड कोसळला

शिवोलीत दिलायला यांचा दबदबा; कळंगुट पंचायतीवर अखेर भाजपचाच झेंडा

दैनिक गोमन्तक

शिवोली : बार्देश तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पंचायतींपैकी कळंगुट पंचायतीवर भाजपचे जोजफ सिक्वेरा व त्यांच्या गटातील सदस्यांनी पंधरा वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा ताबा मिळवला आहे. आमदार मायकल लोबो यांच्या‌ ‘टुगेदर फॉर कळंगुट पेनल’चे अकरापैकी केवळ तीनच उमेदवार निवडून आल्याने सध्या पंचायतीत विरोधी बाकावर बसण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.

आसगाव पंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा माजी सरपंच हनुमंत नाईक, तर उपसरपंचपदी सोनिया क्षीरसागर नाईक यांची वर्णी लागली आहे. मार्ना-शिवोली पंचायतीच्या सरपंचपदी शर्मिला वेर्णेकर या पुन्हा विराजमान झालेल्या असून उपसरपंचपदी मार्ना प्रभागातून भरघोस मतांनी दुसऱ्यांदा विजयी झालेल्या विलियम फर्नांडिस यांनी पदभार सांभाळला आहे.

ओशेल पंचायतीच्या सरपंचपदी प्रवीण कोचरेकर यांची बिनविरोध निवड झाली असून उपसरपंचपदी ॲड. रेषल हडफडकर यांची वर्णी लागली आहे. सडये पंचायतीच्या सरपंचपदी दीपा पेडणेकर यांची निवड झाली आहे.

राजकीय वाटचाल धोक्यात

मतदारसंघातील अन्य पंचायतींपैकी कांदोळी, पर्रा, नागवा - हडफडे या पंचायतींवर आपले वर्चस्व राखण्यात मायकल लोबो यांना सध्या तरी यश मिळाल्याचे दिसत आहे. मात्र, मतदारसंघाचा शिरोमणी असलेल्या कळंगुट पंचायतींवरील ताबा गेल्याने लोबोंच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम होणार असल्याचे सध्या संकेत मिळत आहेत.

दिलायला समर्थक गटांचा विजय

सहा पंचायतींवर आपल्या समर्थक गटांचा विजय झालेला असल्याने पुढील राजकीय वाटचाल तसेच मतदारसंघाचा विकास आणि प्रगती आपण त्यांच्यासोबतीनेच करणार असल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले. तथापी, लक्ष्मीकांत चिमुलकर तसेच अग्नेस यांनी आपली नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT