Michael Lobo | Congress vs BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Shacks : शॅक्स उभारणीसंदर्भात कायद्यात दुरुस्तीची गरज : लोबो

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स सील केलेत

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रिट याचिकेवर कारवाई करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स सील केलेत. मुळात पंचायत राज कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. कारण, पंचायतीकडून तात्पुरता शॅक्स स्थापनेची आधी परवानगी घेतली नाही, त्यामुळे हे शॅक्स बंद करावे लागले, अशी प्रतिक्रिया कळंगुटचे आमदार मायकल लोबोे यांनी दिली.

सध्या शॅक्स हे पर्यटन विभागाच्या परवानगीने तसेच पंचायतीच्या व्यापार परवान्याने ऑपरेट होतात. याआधी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या संमतीची गरज भासत नव्हती, त्यामुळेच प्रदूषण मंडळाची संमती नसल्याने हे शॅक्स न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद करावे लागले.

अशावेळी कायद्यात दुरुस्ती करुन यापुढे प्रदूषण नियंत्रण मंडळाऐवजी थेट पंचायत किंवा पर्यटन विभागाकडून शॅक्स चालविण्यास संमती मिळेल, अशी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल याकडे लोबोंनी लक्ष वेधले.

‘पंचायत राज’ मधे काही त्रुटी

पंचायत राज कायद्यात काही त्रुटी आहेत. सध्या शॅक्स बांधण्यासाठी पंचायतीकडून स्थापना परवाना घ्यावा लागतो. मात्र, पंचायत थेट व्यापार परवानाच देते. हा स्थापना परवाना न घेतल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार शॅक्स सील केले आहेत.

स्थापना व व्यापार परवाना या दोन्ही गोष्टींमुळे काहीसा गोंधळ निर्माण झालाय. मात्र आता सगळ्यांना समजले आहे की, अगोदर स्थापना परवाना घेऊनच पुढील प्रक्रिया करावी लागेल, असेही लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT