पणजी: मतमोजणी होण्यापूर्वीच काही राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून संपर्क साधला जात असला तरी त्याला काँग्रेसचे उमेदवार बळी पडणार नाहीत. भाजपशी माझी जवळीक असल्याच्या ‘त्या’ अफवा आहेत. भाजपचे सत्तेमधील व विजयाची खात्री असलेले अपक्ष उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. मगो व गोवा फॉरवर्डला यापूर्वी भाजप सरकारने लाथाडले आहे त्यामुळे ते त्यांच्यासोबत जाणार नाहीत, असा दावा काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी करत भाजप नेत्यांमध्येच धुमशान सुरू असल्याचा पलटवार केला.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर माजी मंत्री मायकल लोबो हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या व्यासपीठावर आले. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोबो यांच्याशी संपर्क साधल्याचा तसेच भाजपचे निवडणूक
तर पक्षाची संसदीय समिती निर्णय घेत असते. मनोहर पर्रीकर असताना त्यांचे केंद्रात असलेल्या वजनामुळे त्यांचा निर्णय स्वीकारला जात होता. प्रदेश समिती उमेदवारांची नावे पाठवते व त्याची निवड संसदीय समिती करते. कार्यकर्त्यांमधील नाराजी तसेच उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा परिणाम झालेला नाही.
मायकल लोबो पक्षातून गेले, त्याचा परिणाम निकालावर होईल का?
लक्ष्मीकांत पार्सेकर हे पक्षामध्ये वाढलेले नेते आहेत, तर मायकल लोबो हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. लोबो यांनी त्यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. त्यांच्या काही अटी व मागण्या होत्या, त्या पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांनी किती प्रभाव पाडला आहे, हे 10 मार्चला होणाऱ्या मतमोजणीवेळीच कळेल.
भाजप 21 पेक्षा अधिक जागा जिंकणार, तर मग देवेंद्र फडणवीस हे मगो नेत्यांशी चर्चा करतात, त्यामुळे या जागा मिळणार नाहीत, याचे भय आहे का?
देवेंद्र फडणवीस हे गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत. गोव्यातील भेटीत त्यांना मतदारसंघातील मतदानासंदर्भातील आढावा देण्यात आला. ते राष्ट्रीय नेते असल्याने त्यांचे इतरांशीही संबंध आहेत. मात्र त्यांची इतर विरोधी नेत्यांशी चर्चा झाली, याबाबत मला माहिती नाही.
भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व राज्य प्रदेश समिती तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन घेत नाही का?
प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्या नेत्याशी चर्चा केली जाते. भाजप कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतले जाते. त्याची कल्पना दिली जाते. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वांनाच विश्वास घेऊन व चर्चा करून घेतले जातात.
भाजप सरकार स्थापनेसाठी ढवळीकरांचा पाठिंबा घेणार नाही असे नेते म्हणतात आणि फडणवीस त्यांची भेट घेतात, याचा अर्थ काय?
राजकारणात परिस्थितीनुसार त्या त्या वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात व सर्व काही बदलते. ते निर्णय त्यावेळीच घेतले जातात. त्या अगोदर घेतले जात नाहीत.
मगोपला सत्तेशिवाय राहता येत नाही. ते सोबत आले तर बरोबर घेणार का व भाजपची काय भूमिका असेल?
2012 मध्ये मगोपशी युती करून त्यांना सत्तेत बरोबर घेण्यात आले होते. भाजप यावेळी स्वबळावर निवडणूक लढवत आहे व मगोला पाठिंबा द्यायचा असल्यास त्यांचे स्वागत करू. 2017 मध्ये भाजप सरकार स्थापन करायचे किंवा बरखास्त करायचे, हा मुद्दा होता. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांनी प्रादेशिक पक्षाच्या आमदारांना सोबत घेऊन स्थिर सरकार दिले होते.
भाजप या राष्ट्रीय पक्षाला मगो सारखा पक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंत हा नेता नको, अशा अटी घालतो. विश्वजीत राणे नेतृत्वासाठी योग्य उमेदवार आहे, असे सुदिन ढवळीकर यांनीच म्हटले आहे?
सुदिन ढवळीकर यांच्याशी भाजप नेत्यांची बोलणी झालेली नाही. वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पक्षाचे नेतृत्व ठरवण्याचा निर्णय घेण्यास केंद्रीय नेतृत्व समर्थ आहे. भाजपच्या ताकदीवर सरकार स्थापन झाले आणि मगोपने पाठिंबा दिला तर तो घेऊ.
पर्रीकर असताना भाजपला 33 टक्के मतदान होत होते. मात्र ते यावेळी नाहीत. कार्यकर्त्यांतील नाराजी याकडे पाहताना भाजपला बहुमत मिळणार असा दावा कोणत्या आधारावर करता?
विधानसभा निवडणुकीत 2021 मध्ये 34.68 टक्के मते व 21 जागा तर 2017 मध्ये 33 टक्के मते व 13 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपला सरासरी 35 ते 36 टक्के मते मिळतात. त्यामुळे यावेळी 21 पेक्षा अधिक जागा मिळतील, हे नक्कीच. यावेळी प्रथमच पर्ये आणि ताळगाव मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजय मिळवणार आहे.
भाजपने ज्यांना विजयाची खात्री धरून प्रवेश दिला, ते अंगलट आले, अशी चर्चा आहे. फोंड्यात रवी नाईक व साळगावमध्ये जयेश साळगावकर यांचे स्थान डळमळीत असल्याचे बोलले जाते, त्याकडे कसे बघता?
भाजपने केलेल्या सर्वेनुसार या दोन्ही मतदारसंघांत भाजप जिंकणार आहे. या मतदारसंघांतील बहुजन समाजाची मते एकसंध राहिली असून त्यात विभाजन झालेले नाही. २०१७ सालच्या निवडणुकीत विषय वेगळे होते. त्यामुळे यश मिळाले नव्हते. यावेळी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले आहेत. त्यामुळे माझा हिशेब चुकणार नाही.
भाजपसाठीचे ख्रिश्चन मतदान हलले आहे. हळदोणे मतदारसंघात तसे घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप उमेदवार निवडून येण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
भाजपचे कार्यकर्ते हे बूथपासून ते वरपर्यंत कार्यरत असतात. या मतदारसंघात ख्रिश्चन तसेच बहुजन समाजाची मते टिकलो यांनाच पडली आहेत. त्यांनी या मतदारसंघात केलेल्या कामाची पावती मिळेल. त्यामुळे येत्या मतमोजणीत टिकलो हे जिंकतील, यात जराही शंका नाही.
विरोधी व अपक्ष संभाव्य विजयी उमेदवारांच्या संपर्कात विश्वजीत राणे आहेत. मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या या हालचाली सुरू आहेत, अशी राज्यभर चर्चा आहे.
विनाकारण विश्वजीत राणे यांच्यावर ते गोव्यात नसतानाही आरोप होत आहेत. ते वैयक्तिक कामासाठी गोव्याबाहेर जात आहेत. ते पक्षाशी प्रामाणिक आहेत. यावेळी ते मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील. केपेतून बाबू कवळेकर तर साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत पराभूत होतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. हे दोन्ही उमेदवार जिंकून येतील. सावंत किमान 5 हजार मतांच्या फरकाने जिंकतील, याची मला खात्री आहे.
मगोपचे काँग्रेसला समर्थन
मी भाजपमधून फुटून काँग्रेसमध्ये गेलो नाही, तर आमदारकीचा कालावधी संपल्यानंतरच राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपला कोणीही पाठिंबा देणार नाही. मगो काँग्रेसबरोबर सत्ता स्थापण्यासाठी पाठिंबा देईल, असेही लोबो यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.